HOME   व्हिडिओ न्यूज

सोयाबीनला आणखी चांगला भाव येईल- मधुकर गुंजकर

अनेक देशात सोयाबीनच्या चांगल्या उत्पादनाचे संकेत म्हणून तूर्त भाव कमी


लातूर: यंदाच्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. सुरुवातीचा बराचसा काळ अपेक्षाभंग करणारा होता. बावीसशे-चोवीसशे पासून सुरुवात झाली. पण मध्यंतरी डिओसीची मागणी वाढल्याने आपल्याकडच्या सोयाबीनला चार हजारापर्यंत भाव मिळाला. आता तो परत कमी झाला आहे. काल सोयाबीन ३५८५ रुपयांनी गेलं असं असलं तरी आगामी काळात आणखी चांगला भाव येईल असा विश्वास बाजार समितीचे सभापती मधुकर गुंजकर यांनी व्यक्त केला. सोयाबीन घेणार्‍या अनेक देशात मधल्या काळात या पिकासाठी अनुकुल वातावरण नव्हते. या काळात आपल्या सोयाबीनला भाव आला. आता या देशात सोयाबीन चांगले येईल अशी स्थिती असल्याने डीओसीची मागणी कमी झाली आणि भाव कमी झाले. पण आगामी काळात हे भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस चांगला झाल्याने ऊसाचे क्षेत्र वाढले आणि सोयाबीनचे कमी झाले हा मुद्दाही गुंजकर यांनी अधोरेखित केला.


Comments

Top