• 23 of February 2018, at 3.59 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

मनपा आयुक्तांनी केली सिद्धेश्वर यात्रा कामाची पाहणी

मनपा आयुक्तांनी केली सिद्धेश्वर यात्रा कामाची पाहणी

लातूर: लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्याची सुरुवात होणार असून तेथील कामाची तयारी अंतिम टप्यावर आहे. या ठिकाणच्या कामाची पाहणी मनपा आयुक्त अच्युत हंगे यांनी केली, यावेळी त्यांनी मनपातील सर्व उपस्थित विभाग प्रमुखांना कोणत्याही प्रकरची अडचण किंवा कमतरता यात्रेकरिता होऊ नये असे सांगत योग्य नियोजन करा असे आदेशित केले. यावेळी संयोजक विश्वस्त अशोक भोसले, सहसयोजक विक्रांत गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, सुरेश गोजमगुंडे, द्यानोबा कामने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे डॉ. सुधीर भातलावंडे, सोमाणी, व्यवस्थापक दत्ता सुरवसे, धनंजय बेबंडे, चेतन कोले, विष्णू खंदाडे, गोरोबा लोखंडे, मनपाचे सुर्यकांत राउत, जरीचंद ताकपिरे, अभियंता मुंडे, कुलकर्णी, संजय कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी समीर मुलाणी, रुक्मानंद वडगावे, अग्निशामक विभागाचे अशोक सुतार आदींची उपस्थिती होती.


Comments

Top