HOME   व्हिडिओ न्यूज

प्रभाग १८ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


लातूर: नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये आज रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. सतत पडद्याच्या मागे असणार्‍या स्वच्छता निरीक्षकांना यावेळी उदघाटनाचा मान देण्यात आला असे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. जिंदल टॉवर्सच्या मागे ६०० मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. प्रमुख स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत राऊत यांच्या हस्ते टिकाव मारुन आणि प्रमुख उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कलीम शेख, नगरसेविका भाग्यश्री शेळके, अफरीन खान, शशिकांत हंडे, आक्रम शेख, रवी कांबळे, धोंडीराम सोनवणे, पद्माकर शिंदे, संजय यलगरवाड, सोमनाथ भरडे, माधव पिटले, दत्ता चेवले, राजेश पवार आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


Comments

Top