• 23 of February 2018, at 4.02 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

साठे चौकात हवंय अण्णाभाऊंच्या नावाने सभागृह

लातूर: गंजगोलाईतले अतिक्रमण हटवताना अण्णाभाऊ साठे चौकही रिकामा करण्यात आला. या चौकात आता भली मोठी जागा रिकामी झाली आहे. या जागेला कुंपणही घालण्यात आले आहे. या जागी अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाजाने केली आहे. या शिवाय महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ लहुजी साळवे यांचा पुतळा उभा करावा, राजीवनगर भागात खुल्या जागेत सभागृह बांधावे अशा मागण्या या समाज बांधवांनी आज मनपात आयुक्त, महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींकडे केल्या. या तीनही वरिष्ठांनी या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हे सगळे विषय स्थायी समिती आणि सर्वसाधारण बैठकीत मांडू, मंजूर करुन घेऊ आणि बजेट मिळताच कामे सुरु करु असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या विषयांना मंजुरी न मिळाल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा जीए गायकवाड आणि सुनील बसपुरे यांनी दिला आहे.


Comments

Top