HOME   व्हिडिओ न्यूज

महादेव जानकर, राम शिंदे न आल्यानं धनगर आंदोलनाला फरक पडणार नाही

आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणारच, फडणविसांना फक्त शिफारस करायचीय- अण्णा डांगे


लातूर: धनगरांना आरक्षण देऊ या आश्वासनावर सत्ता मिळवणार्‍या फडणवीस सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच धनगर समाजाच्या वतीने मेळावे, धरणे अशी आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज लातुरच्या गांधी चौकात ऑल इंडिया धनगर समाज संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसह माजी मंत्री अण्णासाहेब डांगेही या धरणे आंदोलनास उपस्थित राहिले. अनुसुचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा ३६ वा क्रमांक आहे. राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केल्यास छोट्याशा घटना दुरुस्तीतून या समाजाला आरक्षण मिळू शकतं असं डांगे म्हणाले. धनगर समाजाचा आधार घेऊन मंत्रीमंडळात स्थान मिळवणारे महादेव जानकर आणि राम शिंदेंचाही याला पाठिंबा आहे पण सत्तेत राहून त्यांना बोलता येत नाही. माणूस जसा स्वाभिमानी असतो तसा लाचारही असतो, ते मंत्री असले तरी आमच्यासोबत येतीलच असे डांगे म्हणाले. यावेळी नागनाथ गाडेकर, संभाजी बैकरे, शिवाजे शिंदे, हनमंत घोडके आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top