• 23 of February 2018, at 3.56 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

गोलाईच्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे सुरु

लातूर: मोठ्या वेगाने सुरु झालेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेने गंजगोलाई साफ केली पण साफ केलेल्या जागी पुन्हा बस्तानं मांडली गेली आहेत. आजही गंजगोलाईतला अर्धाच रस्ता वाहतुकीच्या कामाला येतो. अशीच अवस्था आतील रस्त्यांचीही आहे. कापडलाईन ते लोखंडलाईनला जाणारा रस्ता, कापड लाईन ते भुसार लाईनला जाणारा रस्ता....हे सगळे रस्ते अतिशय लहान आहेत. त्यात अनेक दुकानांच्या झापड्या पुढे आल्या आहेत. गटारींवर धंदे थाटण्यात आले आहेत. या छोट्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे काम आज सुरु झाले आहे. हे सगळे रस्ते रिकामे झाले तर गोलाईतला सगळाच व्यवहार आणि वाहतूक सुरळीत होणार आहे. पंडीत पवार हे या मोहिमेचे प्रमुख आहेत. या मोहिमेत हटवण्यात आलेले साहित्य मनपाने जप्त केले आहे.


Comments

Top