• 23 of February 2018, at 3.42 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   टॉप स्टोरी

माझं मराठी राज ठाकरे यांच्यापेक्षा भारी- कलेक्टर जी. श्रीकांत

मराठी चांगली भाषा आहे, मुझे सबकी मराठी अच्छी लगती है!

लातूर: मराठी लोकच मराठी चांगली बोलतात असं नाही. अपन लोग उनके उपर भारी पडते है, राज ठाकरे के उपर तो और भारी पडते हे उदगार आहेत लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे. आज क्रीडा संकुलावर दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर आम्ही पुन्हा त्यांना या विषयावर बोललो. मघाशी तुम्ही म्हणालात की तुमची मराठी राज ठाकरे यांच्या पेक्षा चांगली आहे तो संदर्भ काय होता? असा प्रश्न त्यांना विचारला, त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ऐसा नही है, आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मराठी बोललं पाहिजे असं राज ठाकरेसाहेब सांगतात, इथले एक संयोजक आहेत ते साऊथ इंडियन आहेत, त्यांचं चांगलं मराठी बघून आम्हाला खूप आनंद झाला. मी कन्नडिगा आहे, परंतु आपण इथं मराठी बोलतो, मला त्याचा आनंद आहे, मराठी सुंदर भाषा आहे. इतर राज्यातले लोक राज ठाकरेंपेक्षा चांगलं मराठी बोलतात असं म्हणायचंय का असाही प्रश्न विचारला, लगेच आपण अनेकांची मराठी ऐकली असेल त्या तुलनेत राज ठाकरे यांची मराठी कशी वाटते असाही प्रश्न विचारला तेव्हा, मुझे सबकी मराठी अच्छी लगती है असं जिल्हाधिकारीसाहेब म्हणाले.


Comments

Top