HOME   लातूर न्यूज

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन


शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

चाकूर: जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांच्या ९३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुमार फाईव्हज् बॉल बॅडमिंटन कल्बच्या वतीने चाकूर येथील जगत् जागृती विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवसीय 'निमंत्रितांच्या खुल्या डे-नाईट बॉल बॅडमिंटन स्पर्धा' आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन चाकूरचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बस्वराज पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. भिमाशंकर मोतीपवळे, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रकाशराव देशमुख, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के, माजी सभापती दिलीपराव देशमुख, चेअरमन विठ्ठलराव माकणे, जगत् जागृती संस्था सचिव नरेश पाटील चाकूरकर, महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे कोषाध्यक्ष धुंडीराज गोसावी, मुंबई असोसिएशनचे सचिव हरिष सातपुते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख, उपनगराध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, नगरसेवक करीमसाहेब गुळवे, माजी सभापती राधाकिशन तेलंग, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे, भाजपा तालुकाध्यक्ष मेघराज बाहेती आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
पुणे, मुंबई, भंडारा, वर्धा, धुळे, नाशिक आदी भागातून या स्पर्धेसाठी संघ दाखल झाले आहेत. यावेळी अभिमन्यू धोंडगे, अनिल वाडकर, सोमनाथ स्वामी, प्रा.राजेश तगडपल्लेवार, अँड. सुधाकर मोतीपवळे, चंद्रकांत कसबे, बालाजी शेवाळे. रमेश सोनटक्के, उमाकांत शेटे, दत्ता आलमाजी, सुरज सोनटक्के, रोटरी क्लबचे चे सचिव शिवदर्शन स्वामी, अरविंद बिराजदार, मधुकर कांबळे यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top