• 23 of February 2018, at 3.52 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   व्हिडिओ न्यूज

दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ विजयी

खासदारांच्या पुढाकाराने लातुरात पहिल्यांदाच आयोजन, दिव्यांगांना संधी मिळणे आवश्यक

लातूर: स्व. बळीराम गायकवाड फाऊंडेशन आणि मुंबईच्या फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने लातुरात दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रीडा संकुलावर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हाधिकार्‍यांनी केलं होतं. या स्पर्धेत मुंबईच्या अ संघानं जेतेपद पटकावलं. मुंबई ब संघ उप विजेता ठरला. मिराज या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. विपुल जैन बेस्ट बॅट्समन तर लातुरचा शिवा बेस्ट बॉलर ठरला. या सर्वांना डॉ. अशोक कुकडे व पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सह आयोजक फिनिक्स फाऊंडेशनच्या सदस्यांना खा. सुनील गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. अशोक कुकडे यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, हरीभाऊ गायकवाड, खासदारांच्या सुविद्य पत्नी, अशोक कांबळे, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, बालाजी पाटील आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top