HOME   लातूर न्यूज

मनसेने घेतले २१ अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व


मनसेने घेतले २१ अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

लातूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनविसे शहराध्यक्ष किरण चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत २१ अनाथ मुलामुलींचे पहिली ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. हा कार्यक्रम पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी विद्यालय, लातूर या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश येरुणकर यांनी केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थीच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे व उद्घाटक राजेश येरुणकर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना जिलाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी विद्यार्थ्याना सांस्कृतिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे शिक्षण पुस्तकी शिक्षणासोबत देण्यात यावे असे मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष नरसिंग भिकाणे यांनी इतिहासात नोंद होईल असे संशोधन करणारे संशोधक या मुलामधून निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष किरण चव्हाण यांनी केले व २१ अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी कांबळे यांनी केले. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण सर, मुख्याध्यापक रामदासी, भास्कर औताडे, रवी सुर्यवंशी, लताताई गायकवाड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रनविर उमाटे, बशीर सय्यद, अण्णासाहेब चव्हाण, माधव गिते, दिनेश नरवणे, गुणवंत सुर्यवंशी, चंदू केंद्रे, आकाश कलवले, शुभम स्वामी, भोगे, ज्ञानेश्‍वर, कुलबुर्गे, अंबेगावे सर पदाधिकारी व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.


Comments

Top