HOME   लातूर न्यूज

अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक केंद्राला देणार ०५ कोटी

पालकमंत्र्यांचे मातंग समाजाच्या शिष्टमंडळास आश्‍वासन


अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक केंद्राला देणार ०५ कोटी

लातूर: शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात उभारण्यात आलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयालगत खुली जागा आहे. या जागेत अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल असे आश्‍वासित करुन पालकमंत्री सभाजीराव पाटील यांनी यासाठी मनपाच्या आगामी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवावा अशा सूचना महापौर सुरेश पवार यांना केल्या. त्याचबरोबर सांस्कृतिक व साहित्य केंद्रासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी केली. येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी भाजपा जिल्हध्यक्ष नागनाथ निडवदे, महापौर सुरेश पवार यांच्यासह मनपा सदस्यांची उपस्थिती होती. मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन हा समाज सातत्याने भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून आमच्या समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात मनपाच्या मालकीची खुली जागा असून या जागेवर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक व साहित्य केंद्र उभारण्यात यावे त्याचबरोबर शहरात आद्यगुरु वस्ताद लहुजी साळवे यांचा पुर्णाकृती पुतळा उभाण्यात यावा या प्रमुख मागण्या केल्या. याबाबत पालकमत्री निलंगेकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांस्कृतिक व साहित्य केंद्र उभारण्यासाठी मनपाच्या आगामी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात यावा, अशा सूचना तात्काळ महापौर सुरेश पवार यांना केली. त्याचबरेाबर या साहित्य केंद्राच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा करिता पुस्तके उपलब्ध करुन देऊन त्याचा लाभ सर्वांना देण्यात यावा अश्या सुचना शिष्टमंडळास दिल्या. सदर केंद्र उभारण्यासाठी शासनाच्या वतीने ५ कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असा विश्‍वास शिष्टमंडळास दिला.


Comments

Top