HOME   लातूर न्यूज

खासदारांनी केली पाहणी, गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू


खासदारांनी केली पाहणी, गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

खासदारांनी केली पाहणी, गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
लातूर: जिल्ह्यात वादळी वार्‍यासह, जोरदार पाऊस व गारपीट झाली. यात शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. नुकसानग्रस्त भागात जावून तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. खा. सुनील गायकवाड यांनी वडवळ येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
जिल्ह्यातील रेणापूर, औसा, वाढवणा, शिरूर अनंतपाळ आदी भागात गारपिटीसह वादळी वारे व जोरदार पाऊस झाला. यात अनेक ठिकाणच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. लातूर तालुक्यातील खुंटेङ्गळ, माटेङ्गळ, भिसेवाघोली या परिसरात गारपीट झाली. रेणापूर तालुक्यातील बिटरगाव, वंजारवाडी, सुमठाणा शिवारात गारांचा पाऊस झाला. जिल्ह्यात अन्य ठिकाणी पाऊस, वादळ, वारा झाला. बोरगाव (काळे) येथे वीज पडून बाळासाहेब देवराव देशमुख यांचे दोन बैल ठार झाले. आदी सर्व नुकसानीचा अहवाल शासनाला तातडीने देण्यात येणार आहे. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सोमवारी चाकूर तालुक्यातील जानवळ व नांदगावच्या शिवारात जावून गारपीट, वादळी वारे व पावसामुळे शेतातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. सदर नुकसानीचे पंचनाम करण्याच्या सूचना शेतातूनच संबंधित अधिकर्‍यांना केल्या. तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्‍वासनही डॉ. गायकवाड यांनी उपस्थित शेतकर्‍यांना यावेळी दिले. यावेळी डॉ. गायकवाड यांनी वडवळचे शेतकरी सूर्यकांत भिंगोले व बबन बेंडके या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी हरिभाऊ गायकवाड, बाबुराव बोडके यांच्यासह चाकूर तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, परिसरातील गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top