HOME   महत्वाच्या घडामोडी

आणखी एक पिस्टल जप्त, दोन हजार फेरीवाले, आजपासून अधिवेशन, दूध वितरणावर बहिष्कार, बड्यांना द्यायचे छोट्यांना नाडायचे........०४ जुलै २०१८

आणखी एक पिस्टल जप्त, दोन हजार फेरीवाले, आजपासून अधिवेशन, दूध वितरणावर बहिष्कार, बड्यांना द्यायचे छोट्यांना नाडायचे........०४ जुलै २०१८

* अविनाश चव्हाण हत्येप्रकरणी आज पाच वाजता पत्रकार भवनात बैठक
* १५ जुलै पर्यंत लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
* लातूर जिल्हा माहिती कार्यालयातील नंदू पवार यांची उस्मानाबादला बदली
* भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे
* ५० विदर्भवादी कार्यकर्त्यांना नागपुरात अटक, आंदोलनाला परवानगी नव्हती
* अविनाश चव्हाण खून प्रकरणात रमेश मुंडे याच्या घरातून आणखी एक पिस्टल जप्त
* लातूर मनपात दोन हजार फेरीवाल्यांची लवकरच ऑनलाईन नोंदणी
* लातूर जिल्ह्यात १५ लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा ओजनेचा लाभ
* लातूर-हैद्राबादच्या पाच फेर्‍या खराब रस्त्यामुळे बंद
* आजपासून नागपुरात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, १३ दिवस चालणार
* १६ तासानंतर मुंबईतली रेल्वे सेवा पूर्ववत
* मुंबईतल्या गोखले पुलाच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेची- मुंबई महापौर
* अमरनाथ यात्रेकरुंवर दरश कोसळली पाचजणांचा मृत्यू
* महिला कर्मचार्‍यांना प्रसुतीनंतर मिळणार १८० दिवसांची पगारी रजा
* महाराष्ट्रात घराणेशाही फोफावणार असेल तर आघाडीला पाठिंबा देणार नाही- प्रकाश आंबेडकर
* १६ जुलैपासून दूध उत्पादक वितरणावर बहिष्कार टाकणार
* नागपुराअल्या आमदार निवासात विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला
* चिखलदर्‍यातील ग्रामदैवताच्या मंदिरात चोरी
* जिल्हा बॅंकेकडून बड्या कर्जदाराकडून वसुली होत नसल्याने शेतकर्‍यांवर अन्याय
* संपावर जाणाऱ्या नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनाही मेस्मा लावा- उच्च न्यायालय
* धुळे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
* शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना राहील- मुख्यमंत्री
* अंधेरी पूल दुर्घटना: चौकशीचे आदेश, येत्या १५ दिवसांमध्ये रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्या बाबतचा अहवाल देणे अपेक्षित
* अंधेरीत पुलाचा भाग कोसळून जखमी झालेल्या ५ जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांची तत्कालिक नुकसान भरपाई
* मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आजवर किती टोल वसुल केला? सर्व्हेचा अहवाल उद्याच्या सुनावणीत सादर करा- मुंबई उच्च न्यायालय
* पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्यामागचे कारण काय- धनंजय मुंडे
* एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटूंबियांना विधिमंडळ काँग्रेसच्यावतीने पाच लाखांची मदत
* नेपाळ: कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान अडकलेल्या ५२५ यात्रेकरुंना वाचवण्यासाठी दोन व्यावसायीक विमानं सिमिकोट इथं दाखल
* एलफिन्स्टन दुर्घटने नंतरही सरकारनं धडा घेतला नाही: संजय निरुपम
* अहमदनगरः स्वस्तात सोने देण्याचं अमिष दाखवून अनेकांना लुटणारी हायप्रोफाइल आंतरराज्यीय टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद
* मुंबई कडून फक्त घेतलं जातं! जेवढी लोकसंख्या आहे त्या मानानी मुंबई साठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात ही खंतं आहे!- रेणुका * शहाणे


Comments

Top