HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजप-कॉंग्रेसचे १२ नगरसेवक गायब, स्थायीची बैठक स्थगित

आर्थिक देवाण घेवाणीवरुन खेळ संपवल्याचा दावा, सभापती मात्र अडचणीत

भाजप-कॉंग्रेसचे १२ नगरसेवक गायब, स्थायीची बैठक स्थगित

लतूर : लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शैलेश गोजमगुंडे यांची निवड झाल्यानंतर पहिलीच बैठक आज आयोजित करण्यात आली होती. पण आर्थिक देवाण घेवाणीवरुन या सभेचा धुराळा उडाला. या सभेत सत्ताधारी नगरसेवकांना मंजूर होणार्‍या कामात मोठा वाटा हवा होता. पण तो मिळाला नाही यामुळे संतापलेल्या स्थायी समितीच्या भाजपाच्या नगरसेवकांनी य बैठकीवर बहिष्कार टाकला. या पाठोपाठ सभापती निवड अयोग्य आहे असे सांगत कॉंग्रेसच्या आठ नगरसेवकांनीही बहिष्कार टाकला. अशा रितीने नूतन स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांची बैठक फेल गेली.


Comments

Top