HOME   महत्वाच्या घडामोडी

पाशा पटेलांचे ५१ हजार बांबू! पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू? जेलभरो रद्द, पवार-बॅनर्जी भेट, आजपासून दुधाला वाढीव भाव, गायकाच्या घरी चोरी......०१ ऑगस्ट २०१८

पाशा पटेलांचे ५१ हजार बांबू! पंतप्रधान विचारतात स्वातंत्र्यदिनी काय बोलू? जेलभरो रद्द, पवार-बॅनर्जी भेट, आजपासून दुधाला वाढीव भाव, गायकाच्या घरी चोरी......०१ ऑगस्ट २०१८

* मराठा क्रांती सेनेचे आज लातुरच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
* पाशा पटेल यांनी लोदगा येथे केली ५१ हजार बांबूची लागवड
* व्हाट्सअ‍ॅपवर आता एकाच वेळी चौघांना व्हिडिओ कॉलींग करता येणार
* मराठा समाजाचे सोलापुरचे जेलभरो आंदोलन स्थगित
* आठ मराठा आंदोलकांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; औसा तहसील कार्यालयातील घटना
* मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद आणि केज येथे दोन तरुणांची आत्महत्या
* मराठा आरक्षणाचा वटहुकूम आजही काढता येईल पण तो न्यायालयात टिकणार नाही- मुख्यमंत्री
* १५ ऑगस्टला कशावर बोलू? तुम्हीच सांगा: पंतप्रधानांचं जनतेला आवाहन
* धनगर समाजाने ज्याला जसे समजेल तसे आंदोलन करावे, औरंगाबादच्या बैठकीत निर्णय
* मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत जेलभरो आंदोलन
* न्या. लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
* वृक्ष लागवडीत नांदेड जिल्हा प्रथम
* कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी विद्यार्थ्यांकरवी लोद्गा येथे केली ५१ हजार बांबूंची लागवड
* चाकणमधील जाळपोळ प्रकरणात चार ते पाच हजार जणांवर गुन्हे
* आजपासून दूध उत्पाद्कांना मिळणार दुधाला २५ रुपये भाव
* मल्टीफ्लेक्स्मध्ये आजपासून मिळणार छापील किमतीत खाद्य पदार्थ, बाहेरचे पदार्थ नेण्यासही परवानगी
* दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून रामदास आठवले लोकसभा लढवणार
* लश्कर-ए-तोयबाचा कमांडर अब्दुल रहमान अल-दाखिल याला अमेरिकेने केले जागतिक दहशतवादी
* मुंबई: पोलादपूर बस अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी ०२ लाख रुपये
* केज तालुक्यातील विडा येथील अभिजीत देशमुख या तरुणाने केली मराठा आरक्षणासाठी आत्महत्या
* दिल्ली: ममता बॅनर्जी यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट
* मराठा आरक्षणावरून चाकण येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणामध्ये २० एसटी आणि खासगी बसेस, चार कार खाक
* राष्ट्रीय अधिव्याख्याता पदासाठी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेचा निकाल जाहीर
* औरंगाबादच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल रंजना भजने यांना ५००० रुपयांची लाच घेताना अटक
* मराठा आरक्षणाचं काम वेगानं सुरू आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
* पुणे: आई, पत्नी आणि मुलीची झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्फने गळा आवळून हत्या करणाऱ्या सागर गायकवाड याला जन्मठेप
* खड्ड्यांसंदर्भात याचिका दाखल करण्याची वेळच का येते?; हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
* पोटाला जात चिकटवण्याची वेळ सरकारनंच आणली: उद्धव ठाकरे
* चाकणमध्ये दंगा करणार बाहेरचे- पोलिस
* सांगली, जळगाव महानगरपालिकेसाठी उद्या मतदान
* मुंबईः गायक मिका सिंगच्या घरात चोरट्यांचा डल्ला, ०३ लाख रुपये पळवले


Comments

Top