HOME   महत्वाच्या घडामोडी

मल्ल्या आणि जेटली, ऊसाला चांगला भाव रेणापुरात दिलीपरावांचा सत्कार, धनंजय मुंडेंचा नारळ, गणेशोत्सवात सलमान, विमान सेवेत भारत तिसरा........१४ सप्टेंबर २०१८

मल्ल्या आणि जेटली, ऊसाला चांगला भाव रेणापुरात दिलीपरावांचा सत्कार, धनंजय मुंडेंचा नारळ, गणेशोत्सवात सलमान, विमान सेवेत भारत तिसरा........१४ सप्टेंबर २०१८

* आजलातूरच्या लातूर लाईव्ह मध्ये बघा वृक्ष लागवड प्रणेते सुपर्ण जगताप यांची मुलाखत
* आज रेणापुरात मांजरा परिवाराचा अर्थात दिलीपराव देशमुख यांचा शेतकर्‍यांकडून सत्कार, ऊसाला चांगला भाव दिल्याने उतराई
* आज रेणापुरात विरोधी पक्षनेते विखे पाटील, शेतकर्‍यांच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित, लातुरात दाखल
* नाशिकमध्ये भांडी घासण्यासाठी तलावावर गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघींचा बुडून मृत्यू
* अण्णा हजारे यांच्या नियोजित उपोषणाबाबत चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन आज भेटणार अण्णांना
* अंनिसच्या 'भारतीय' शब्द वगळण्याचा धर्मादाय आयुक्तांचा आदेश नागपूर खंडपीठाने केला रद्द
* पुणे, नगर, बीड जिल्ह्यात दरोडे घालणारी पाच जणांची टोळी गजाआड
* बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा: धनंजय मुंडे यांचे परळीतील घर जप्त करण्याचे सत्र न्यायलयाचे आदेश
* घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, शरद पवार यांनीच धनंजय मुंडेंना नारळ द्यावा- सुरेश धस
* देशातील सामाजिक संस्था आणि चळवळीकडूनच नवभारताची उभारणी शक्य अण्णा हजारे
* सामाजिक संस्थांनी पारदर्शकता ठेवली नाही, मुल्यांचे कृतिशील अनुकरण केले नाही, तर संस्थांची विश्वासार्हता नष्ट होऊ शकते- अण्णा हजारे
* सांगलीत एका विवाहात अक्षतांऐवजी फुले, तर रुखवतात संसारोपयोगी साहित्याऐवजी दिली पुस्तके
* सांगली, कोल्हापूर सर केल्याने पुढचे लक्ष्य सातारा- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही
* युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नागपुरात नगरसेवकाने घेतली हुक्का पार्लरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक
* प्रवासी सुविधांबाबत पुणे विमानतळाने पटकाविले जगभरातील तिसरे स्थान, कोलकाता विमानतळही तिसऱ्या स्थानावर
* पुण्यात हिंजवडीत आयटी अभियंत्याची घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
* पतंजली समूहाची गायीचे दूध आणि दुग्धजन्य उत्पादने आली बाजारात, दुधाचा प्रति लिटर भाव ४० रुपये
* जोतिबा फुले जनआरोग्य अभियानात लाभार्थीच्या उपचारांसाठी २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
* अंबानींच्या गणेशोत्सवास शाहरूख ,सलमान खान यांची हजेरी
* विजय मल्ल्या फरार होणार असल्याची माहिती अरुण जेटली यांनी का लपवली? मल्ल्याला वाचवण्याचे आदेश होते का?- राहुल गांधी
* विजय मल्ल्या सभ्य माणूस, त्याच्याविरोधात तक्रार नको, राहुल गांधींनी दबाव आणला होता- शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी
* ०१ मार्च २०१६ रोजी विजय मल्ल्या अरुण जेटलींना भेटला, सीसीटीव्ही फ़ुटेज तपासा - काँग्रेसची मागणी
* मल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी एसबीआयला सावध केले होते, बँकेने ऐकले असते तर मल्ल्या पळाला नसता- सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे
* स्टेट बँक ऑफ इंडियाने मल्ल्याला थांबवण्याबाब कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही - दुष्यंत दवे
* न्या. रंजन गोगोई झाले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, ०३ ऑक्टोबर रोजी स्वीकारणार पदभार
* पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात वीटभट्टी मजुराला लागली दीड कोटीची लॉटरी
* दिल्ली विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वर्चस्व


Comments

Top