HOME   महत्वाच्या घडामोडी

खडू-काथ्या-चॉकलेटचे गणपती, कृपाशंकर तूर्तास कॉंग्रेसमध्येच, हायकोर्टाने घातली डॉल्बीवर बंदी, आंध्रात राहूल गांधींना पसंती......१५ सप्टेंबर २०१८

खडू-काथ्या-चॉकलेटचे गणपती, कृपाशंकर तूर्तास कॉंग्रेसमध्येच, हायकोर्टाने घातली डॉल्बीवर बंदी, आंध्रात राहूल गांधींना पसंती......१५ सप्टेंबर २०१८

* विसर्जनात डॉल्बीला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली, पुढची सुनावणी १९ सप्टेंबरला
* डॉल्बी वाजणारच, खा. उदयनराजे यांचा निर्धार
* दगडूशेठ गणपतीसमोर शाळकरी विद्यार्थ्यांनी घातला सूर्य नमस्कार
* पणजी पाच हजार खडूंपासून, कोकणात काथ्यांपासून तर नागपुरात चॉकलेटचा गणपती
* नालासोपार्‍यात ७० किलो मोदकापासून केला गणपती तयार
* पंढरपुरात अनेक मुस्लिम कुटुंबांनी आपल्या घरी केली गणरायाची प्रतिष्ठापना
* नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान, तिघांचा मृत्यू
* मनोहर पर्रीकर आजारपणामुळे काही दिवस मुख्यमंत्रीपद सोडणार, अमित शहांना केली विनंती
* आज पेट्रोल २६ तर डिझेल २५ पैशांनी महागले
* महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोलने पार केला ९० रुपयांचा आकडा
* अर्थव्यवस्थेवर आज पंतप्रधानांनी बोलावली बैठक
* मुंबईतल्या बेकायदा मंडपांना परवानगी दिल्याबदाल मुंबई आयुक्तांवर होणार कारवाई
* मल्ल्या-जेटली संबंधांची कॉंग्रेसला होती कल्पना, मग आताच जाग का आली? शिवसेनेचा सवाल
* यवतमाळमध्ये बोगस किटकनाशकांच्या कारखान्यावर छापा
* गिरीश बापट यांनी नवाब मलिकांवर दाखल केलेला खटला घेतला मागे
* पुणे फेस्टीवलला सुरुवात, जोरदार प्रतिसाद, हेमा मालिनीने केले उदघाटन
* सध्या मी काँग्रेसमध्येच, भविष्यातलं सांगू शकत नाही- कृपाशंकर सिंह
* दाभोलकर हत्या: अमोल काळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, गौरी लंकेश हत्येतील अमोल दाभोलकरांच्या हत्याकटात सामील असल्याचे उघड
* हरयाणात मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध करत महिलांवरील अत्याचाराबाबत नरेंद्र मोदींचे मौन का?- खासदार सुप्रिया सुळे
* गिरीश महाजन यांच्या बरोबर बैठक होऊनही अण्णा हजारे ०२ ऑक्टोबरच्या उपोषणावर ठाम
* पुण्यात एसएससी बोर्ड कार्यालयाच्या स्वच्छतागृहात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय
* नागपुरात तीन कोटींपेक्षा अधिक किंमतीचा ०२ मेट्रिक टन गांजा जप्त
* मफतलाल मिलचा सात एकरच्या भूखंडावर राणीची बाग विस्तारणार, येणार परदेशी पशुपक्षी
* अमित शहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
* पुणे फेस्टिव्हलची केरळमधील पूरग्रस्तांना ०२ लाखाची मदत
* राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी सत्यजीत तांबे विजयी, अमित झनक व कुणाल राऊत झाले उपाध्यक्ष
* महावितरणच्या ०८ हजार कोटीच्या दरवाढीला राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी, १२ हजार कोटींची दरवाढ होणार निवडणुकांनंतर
* नवी मुंबईत विनापरवाना लाऊडस्पीकर लावणार्‍या प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्याने पोलीस आयुक्त संजीव कुमारांना हायकोर्टाची नोटीस
* अहमदनगरमध्ये गणपती मंदिरासमोर १०८ मुलींनी सादर केलं भरतनाट्यम
* राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज काँग्रेस कोअर कमिटीची बैठक
* आंध्र प्रदेशात झालेल्या सर्व्हेत राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून जास्त पसंती
* रुपयाचं अवमुल्यन झाले असले तरी गेल्या पाच वर्षात रुपयाची परिस्थिती सुधारलेली- केंद्रीय अर्थ मंत्रालय
* संघाच्या कार्यक्रमाचे अखिलेश यादव आणि मायावतींना निमंत्रण
* हुंड्यासाठी छळ, पीडितेच्या सुरक्षेसाठी आरोपींना तात्काळ होणार अटक, पण आरोपींना मिळणार अंतरिम जामीन- सुप्रिम कोर्ट
* स्वित्झर्लंड टुरिझमने उभारलेल्या श्रीदेवी यांच्या अनावरण श्रीदेवी कन्या जान्हवी कपूर करण्याची शक्यता
* पाकिस्तान सीमेवर भारताने उभारली 'इलेक्ट्रॉनिक भिंत', घुसखोरांना ओळखण्यास आणि कठीण ठिकाणांवरील घुसखोरी रोखण्यास मिळणार मदत
नरसंहार चौकशीप्रकरणी रॉयटरच्या दोन पत्रकारांना शिक्षा, कायदा मोडल्याने झालेली शिक्षा योग्यच- नमारच्या नेत्या आंग सान सू ची


Comments

Top