HOME   महत्वाच्या घडामोडी

पॅंथर्सचा रास्ता रोको, संभाजी पाटलांना खैरेंचा इशारा, लातुरात वीज मीटर्सचा तुटवडा, भाजीपाला भडकला, पवारांचे चिरंजीव राजकारणात, गांधी जयंतीपासून भाजपची पदयात्रा.....०३ ऑक्टोबर २०१८

लातूर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा यासाठी आज बोरगाव काळे येथे व्हीएस पॅंथर्सचा रास्ता रोको

पॅंथर्सचा रास्ता रोको, संभाजी पाटलांना खैरेंचा इशारा, लातुरात वीज मीटर्सचा तुटवडा, भाजीपाला भडकला, पवारांचे चिरंजीव राजकारणात, गांधी जयंतीपासून भाजपची पदयात्रा.....०३ ऑक्टोबर २०१८

* लातूर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा यासाठी आज बोरगाव काळे येथे व्हीएस पॅंथर्सचा रास्ता रोको
* पालकमंत्री संभाजी पाटलांची दादागिरी खपवऊन घेतली जाणार नाही- खा. चंद्रकांत खैरे
* लातूरच्या महावितरणकडे वीज मीटर्सचा तुटवडा
* लातुरात अण्णा हजारेंच्या उपोषणासाठी समर्थन पण अण्णांनी उपोषण घेतले माघारी
* लातुरात फिनॉमिनलने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात गुंतवणूकदारांचे उपोषण
* लातूर शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसने नेमली नियंत्रण समिती
* लातुरात भाजीपाल्याचे भाव कडाडले
* अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राजकारणात येण्याच्या तयारीत
* गिरीश महाजनांची शिष्टाई सफल, अण्णा हजारेंचे उपोषण मागे, सरकारच्या निर्णयाने काही अंशी समाधानी पण अंमलबजावणी हवी - अण्णा
* राहिलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गांधी पुण्यतिथी पासून आंदोलन - अण्णा हजारे
* राज्यातील लोकायुक्ताला मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्याचे अधिकार हवेत- अण्णा हजारे
* गांधी जयंतीपासून भाजपची राज्यात पदयात्रा मोहिम, नागपुरमधील पादयात्रेत देवेंद्र फडणवीस सहभागी
* नरेंद्र मोदी स्वतः खात नाहीत हे खरं, ते दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात- भारिपचे प्रकाश आंबेडकर
* संविधान बचावच्या घोषणा देणार्‍यांनी आपल्या कुटुंबाला वाचवावे, संविधान वाचवायला आम्ही सक्षम- असदुद्दीन ओवैसी
* औरंगाबाद येथे झाली भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम वंचित विकास आघाडीची जाहीर सभा
* शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातली कुरघोडी थांबवावी, पक्ष एकसंध कसा राहिल हे पहावे मग आम्हाला टक्कर द्यावी- पंकजा मुंडे
* लोकांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आणले मात्र आता त्यांची गाडी पंक्चर झाली आहे- राहूल गांधी
* मंदिर ड्रेसकोडऐवजी महिला सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज- सुप्रिया सुळे
* ‘फू बाई फू’फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन, गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते
* एसटी महामंडळाची राज्यभर ६०९ बस स्थानके, ५६८ बस स्थानके वापरात, एकाच टप्प्यात ३०५ स्थानकांना चढविला जाणार नवा साज
* ठाणे येथे एकतर्फी प्रेमातून तरूणीचे पेटवलं घर
* नागपुरचे आमदार आशिष देशमुख यांची भाजपाला सोडचिठ्ठी
* राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात कसं वागावं, प्रशासन कसं चालतं याचं प्रशिक्षण घेणं आवश्यक- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे १७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ दौऱ्यावर
* जागतिक नदी दिनी मुंबईत पोयसर नदीतून काढला २५ हजार किलो कचरा
* खादी निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांना खादी निर्मितीकडे आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी- लघू उद्योग मंत्री गिरीराज सिंह
* रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँका संपवण्याचा डाव, बँका वाचवण्यासाठी जनमत अनुकूल करण्याचे काम सहकारी बँकांनी करावे- विद्याधर अनास्कर
* बहुसंख्य नागरिक रामाची पूजा करतात, विरोधकही अयोध्येतील राममंदिराला विरोध करणार नाहीत- सरसंघचालक मोहन भागवत
* चार वर्षांत लोकसभा व राज्यसभा खासदारांच्या वेतन व भत्त्यांवर १९९७ कोटी खर्च, लोकसभेच्या प्रत्येक खासदारावर ७१ लाख झाला खर्च
* गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वातच साऱ्या मानवजातीला एकत्र आणण्याची क्षमता- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* गुजरातमधील गीरच्या जंगलात २० दिवसांत २१ सिंहांचा मृत्यू


Comments

Top