HOME   महत्वाच्या घडामोडी

नानाची नार्को, दुष्काळ तीव्र होणार, न्यायमूर्तींच्या पत्नी आणि मुलाची हत्या, आंबेड्कर खासदार व्हावेत, जास्तीत जास्त साखर निर्यात करा......१४ ऑक्टोबर २०१८

नानाची नार्को, दुष्काळ तीव्र होणार, न्यायमूर्तींच्या पत्नी आणि मुलाची हत्या, आंबेड्कर खासदार व्हावेत, जास्तीत जास्त साखर निर्यात करा......१४ ऑक्टोबर २०१८

* मराठा आरक्षणाचा अहवाल सादर, कार्यवाहीसाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत- नारायण राणे
* राज्यातील दुष्काळी स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता
* महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या १९ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
* नाना पाटेकर यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, अभिनेत्री तनुश्री दत्ताची मागणी
* अल निनोमुळे महाराष्ट्रातील दुष्काळात भर पडण्याची शक्यता
* आज पेट्रोल ०६ तर डिझेल २० पैशांनी महागले
* संपूर्ण मराठवाडा दुष्काळी जाहीर करा, हेक्टरी ५० हजाराची मदत द्या- कॉंग्रेसची मागणी
* साईबाबांच्या समाधीला १०० पूर्ण
* १६ तारखेला धनगर समाजाचा महामेळावा, सगळ्या संघटना सहभागी होणार
* हरयाणामध्ये दिवसाढवळ्या सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींची पत्नी आणि मुलाची गोळ्या घालून हत्या
* मराठा आंदोलनात तरुणांवर झालेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकींचा घेराव घालणार
* शास्त्रीय पद्धतीनं दुष्काळ जाहीर करण्याची वाट कसली पाहता?- अशोक चव्हाण
* प्रख्यात सितार आणि सूरबहार वादक पंडित रवी शंकर यांच्या पत्नी 'पद्मभूषण' अन्नपूर्णा देवी यांचं वृद्धापकाळानं निधन
* स्टेट बँक ऑफ इंडियाची इंटरनेट बँकिग सेवा वापरण्यासाठी ०१ डिसेंबरपर्यंत मोबाइल क्रमांक खात्याशी जोडून घेण्याची अंतिम मुदत
* भारिपचे प्रकाश आंबेडकर खासदार व्हावेत अशी आमची इच्छा, आमच्याकडून बोलणी तोडलेली नाही, त्यांनी प्रतिसाद द्यावा- अशोक चव्हाण
* राष्ट्रवादीकडून ५०-५० टक्के जागावाटपाचा प्रस्ताव, काँग्रेसच्या निर्णयानंतर ऑक्टोबर अखेर आघाडीची चर्चा पूर्ण होणार
* केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे साखर निर्यातीसाठी स्थिती अनुकूल, साखर कारखानदारांनी जास्तीतजास्त साखर निर्यात करावी- शरद पवार
* शाळा केंद्रप्रमुखांनी शिक्षणदूत म्हणून काम करुन तळागाळाच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवावे- शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
* राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्राची विक्री करणार्‍यांवर फौजदारी खटला - सर्वोच्च न्यायालय
* सर्व शिक्षा अभियानातील शुभा साठे यांचे समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक परत घेण्याचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय
* पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर असल्याने संभाजी ब्रिगेडने केले होते अंदोलन
* रत्नागिरीतील फिनोलेक्स कॉलेजच्या विद्यार्थ्याने बनावट गुणपत्रिका सादर करून प्रवेश मि‌ळविला, विद्यार्थ्यासह सहाजण अटकेत
* दहीहंडी उत्सवात मुली पळवून आणण्याचे विधान करणारे भाजपा आमदार राम कदम यांचे नव मतदारांना आमिष
* मतदार यादीत नाव नोंदवल्यास हमर, बेन्टली या गाडयांमधून फिरवेन, शाहरुख, सलमान, वरुण धवनबरोबर भेट घडवेन- राम कदम
* राजीव गांधींप्रमाणेच नरेंद्र मोदींची नोव्हेंबर २०१९ मध्ये हत्या करण्याची धमकी देणारी ईमेल मिळाली दिल्ली पोलिसांना
* गोव्यात काँग्रेसचा बहुमताचा दावा, कॉंग्रेसने केली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी
* शबरीमला मंदिरात येणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवेत- मल्याळम अभिनेते तुलसीधरन नायर, गुन्हा दाखल
* छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार रामदयाल उइके यांचा भाजपमध्ये प्रवेश
* तितली वादळाचा ओदिशात हाहाकार, ०३ लाख लोकांना वादळाचा फटका, दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू, आंध्र प्रदेशात ०८ जणांचा मृत्यू
* राफेल प्रकरणी प्रसारमाध्यमांमधील लोक देखील आमचा आवाज ऐकू इच्छित नाहीत- राहुल गांधींचा आरोप
* राजस्थानात रस्ते अपघातात ०५ महिला आणि ०३ मुलांचा मृत्यू
* हिमालयावर बर्फवृष्टी, दक्षिण कोरियाचे ०५ गिर्यारोहक आणि ०४ नेपाळी गाईड बेपत्ता


Comments

Top