HOME   महत्वाच्या घडामोडी

जायकवाडीचं पाणी मिळणार, सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर, नरेश पाटील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, साखर करा ३१ रुपये......२५ ऑक्टोबर

जायकवाडीचं पाणी मिळणार, सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर, नरेश पाटील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, साखर करा ३१ रुपये......२५ ऑक्टोबर

* मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, जायकवाडीत पाणी सोडणार
* शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी मुख्यमंत्र्यांशिवाय एकही मंत्री हजर नव्हता
* सीबीआयच्या संचालक आणि उपसंचालकाना पाठवले रजेवर
* नागेश्वर राव यांची सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती
* सीबीआयमधील १३ अधिकाऱ्यांची बदली, राकेश अस्थाना यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची पोर्ट ब्लेअरमध्ये बदली
* सक्तीच्या रजेवर पाठविल्याच्याविरोधात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा सर्वोच्च न्यायालयात, शुक्रवारी सुनावणी
* पदावरून दूर करताना केंद्राने सर्व नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसविल्याचा वर्मांचा आरोप
* सीबीआयमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप- कॉंग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी
* शबरीमलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीएसएनएलच्या कमर्चारी रेहाना फातिमाची बदली
* नरेश पाटील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
* सापाच्या विषाची तस्करी करणार्‍या चौघांना सांगलीत अटक
* बील क्लिंटन आणि ओबामा यांचा घातपात प्रयत्न उधळला
* पिंपरी चिंचवडच्या दळवीनगर झोपडपट्टीत सिलिंडरचा स्फोट, आगीत ०५ जणांचा मृत्यू
* शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार्‍या २५ जणांच्या स्पीड बोटीला अपघात, एका तरुणाचा मृत्यू
* देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाच्या कुटुंबियाला जाहीर केली ०५ लाखाची मदत
* सांगलीहून कोल्हापूरकडे जाताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले
* साखरेचा दर ३१ रुपये निश्चित करण्याची केंद्राकडे शिफारस करणार- मुख्यमंत्री
* काही लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत, दुष्काळ सदृश शब्द वापरून लबाडी करत आहेत- मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला
* पूर्वीच्या शासनाने शासन निर्णयात दुष्काळ काळात टंचाई, सदृश्य असा घोळ घातला तो निर्णय बदलला
न्यायमूर्ती नरेश पाटील मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती
* 'मी आत्महत्या करतोय...' असा एसएमएस जिल्हाधिकार्‍यांना पाठवून औरंगाबादेत लिपिक राजेंद्र बागडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
* सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्र्यांची मुलाखत:
* कितीही मतभेद असले तरी सेनेसोबत युती होईल, निवडणुका एकत्रच लढवू, केंद्रात, राज्यात आमचेच सरकार
* अयोध्येच्या मुद्द्यावर सेना- भाजप एकमत, सेना पुढाकार घेत असल्यास चांगली गोष्ट, कायद्याच्या चौकटीत राममंदिराचा प्रश्न सुटेल
* मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आमचे सरकारच करेल
* मुंबई-गोवा क्रूझच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सेल्फी घेण्यापूर्वी क्रूझच्या कॅप्टनची परवानगी घेतली होती
* याआधी महाराष्ट्राने तरुण मुख्यमंत्री बघितलेले नाहीत, त्यामुळे हा विषय जास्त चघळला गेला
* मालेगाव बॉम्ब स्फ़ोट: पुरोहितसह अन्य आरोपींवर हायकोर्ट आज देणार निर्णय
* सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी विद्यापीठे, महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस
* लैंगिक आकर्षणातून शोषण करणे हा मानसिक आजार, तो मनोलैंगिक विकार, 'ट्रबल्ड डिझायर डॉट कॉम' वेबबोर्टलवर चाचणी उपलब्ध
* अराजपत्रित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणार १२ हजार ५०० रुपये, वसुली होणार १० हप्त्यात
* बहुपयोगी बुरशी संशोधनाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल किरण रणदिवेंचे नाव बुरशीच्या नवीन प्रजातीला, डिडालिया फंगसचे नामकरण 'रणदिवीया'
* सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, केंद्रीय दक्षता आयोगाला चौकशीचे अधिकार- अरुण जेटली
* अलोक वर्मांनी राफेल करारातील घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविले- राहुल गांधी, राजस्थानातील प्रचारसभेत
* राफेल प्रकरणात चौकशी नको म्हणून सीबीआयवर छापे- प्रशांत भूषण


Comments

Top