HOME   महत्वाच्या घडामोडी

कासकरला बिर्याणी-पाच पोलिस निलंबित, रुक्मिणीच्या साड्यांचा सेल, अन्वर कॉंग्रेसमध्ये, सात हत्तींचा मृत्यू, शबरीमला प्रकाणी शहांचाही विरोध.....२८ ऑक्टोबर २०१८

कासकरला बिर्याणी-पाच पोलिस निलंबित, रुक्मिणीच्या साड्यांचा सेल, अन्वर कॉंग्रेसमध्ये, सात हत्तींचा मृत्यू, शबरीमला प्रकाणी शहांचाही विरोध.....२८ ऑक्टोबर २०१८

* सामनातील टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- अजित पवार
* दाऊदचा अटकेतील भाऊ कासकरला बिर्य़ाणी खाऊ घालणारे पाच पोलिस निलंबित
* मनोहर पर्रीकर यांना पॅंक्रीएटीक कॅन्सर झाल्याचे जाहीर
* विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट आलेल्या साड्यांचा सेल
* तारिक अन्वर राहूल गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये दाखल
* विजेचा धक्का बसल्यानं ओडिशात सात हत्तींचा मृत्यू
* मराठा आरक्षणासाठी गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा
* शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला अमित शहा यांचाही विरोध
* पेट्रोल ३९ पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी झाले कमी
* दुष्काळामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेकांनी गाव सोडले
* राजकीय वास्तवाची जाण ठेवूनच राजकारण, सेना आणि भाजप वेगळे लढले तर विरोधकांना लाभ- मुख्यमंत्री
* लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी भाजपची युती होईलच- मुख्यमंत्र्यांना विश्वास
* १५ नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा- मराठा क्रांती ठोक मोर्चा
* महागाई, रोजगार आणि संरक्षण या मुंबईकरांच्या तीन प्रमुख समस्या- मुंबईतील खुल्या संवादात पी. चिदंबरम
* २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध शेतकरी लढाई, मी शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार- हार्दिक पटेल
* उद्धव ठाकरेंवर केलेली टीका ही ग्रामीण भाषेत असल्यानेच त्यामध्ये ‘बाप’ शब्द वापरला- अजित पवार
‘* जे बापाचे स्मारक करू शकत नाहीत ते अयोध्येला जाऊन काय करणार’?- अजित पवारांचा होता उद्धव ठाकरेंना टोला
* आघाडीत समान जागा हव्यात, किमान ०५ महिने आधी उमेदवार निश्चित व्हावेत, हातकणंगलेची जागा आमच्याकडे असेल- अजित पवार
* मोदींना कुटुंब नसल्यानं संसारी माणसाचं दु:ख त्यांना कळत नाही, ते बोलतात एक आणि करतात एक- अजित पवार
* भारिप बहुजनचे प्रकाश आंबेडकर चुकीच्या मित्रांकडे गेल्यामुळे आमची थोडीशी अडचण- अशोक चव्हाण
* मुंबईच्या १०१ मासळी बाजाराच्या बाजुला किंवा बाहेर परप्रांतीय मासळी विक्रेत्यांना बंदी घाला- राज्य मच्छिमार कृती समिती
* भाऊचा धक्का ते रेवस मांडवा रो -रो सेवा डिसेंबरपासून, मुंबईकरांचे मांडवा, अलिबाग, गोवा व कोकणाकडे जाणे होणार सुकर
* ठाण्यात माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून खंडणी उकळल्याप्रकरणी तीनजण गजाआड
* देशातील 'आशा' कार्यकर्तींच्या मानधनात दुप्पटीने वाढ
* केरळमधील डाव्यांचे सरकार हिंदूंच्या परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, याची किंमत त्यांना चुकवावी लागेल- अमित शहा
* केवळ मंदिरात जाण्यानं स्त्री-पुरुष समानता येत नाही, हिंदू समाजानं आपल्या धर्मातील कुप्रथा स्वत:हून बाजूला सारल्या आहेत - अमित शहा
* मनमोहनसिंग यांच्यावर "द एक्स्सिडेंटल प्राइम मिनिस्टर" चित्रपट, मनमोहन सिंगांना इतिहास कधीच चुकीचं समजणार नाही- अनुपम खेर
* दहशतवादविरोधी कारवाईत स्थानिकांकडून दगडफेक, जवानाचा मृत्यू, दगड भिरकवणारे हे दहशतवादीच- लष्करप्रमुख
* इस्रो २०२२ मध्ये अवकाशात प्रथमच पाठवणार मानव, 'चंद्रयान २'चे कामही २०१९ मध्ये होणार पूर्ण - इस्रोचे कैलाशवादिवू सीवान
* छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ०४ जवान शहीद, दोन जखमी
* भारत वि. वेस्ट इंडिजः तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा ४३ धावांनी पराभव


Comments

Top