HOME   महत्वाच्या घडामोडी

एसटी कर्मचार्‍यांना १५ हजाराचा बोनस, यशवंत देवांचं निधन, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, आरक्षणात करा बदल, राम मंदिरासाठी अध्यादेश काढा......३० ऑक्टोबर २०१८

एसटी कर्मचार्‍यांना १५ हजाराचा बोनस, यशवंत देवांचं निधन, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, आरक्षणात करा बदल, राम मंदिरासाठी अध्यादेश काढा......३० ऑक्टोबर २०१८

* बेकायदा फलकबाजी करण्यात शिवसेना आणि भजपाच आघाडीवर
* पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल ०८ पैशांनी स्वस्त
* अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता थेट पुढच्या वर्षात
* सीमेजवळ पाकिस्तानचे प्रशासकीय कार्यालय उडवले
* ज्येष्ठ गीतकार, संगीतकार यशवंत देव यांचं निधन
* मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दिवाळी बोनस
* दुष्काळसदृश तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सवलत पास देणार- दिवाकर रावते
* लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता
* शिवसेना - भाजप युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय- भाजप प्रदेशाध्यक्ष
* युती झाल्यास त्याचा लाभ शिवसेनेला होईल, भाजपला लोकसभेत २०० जागा मिळतील- रावसाहेब दानवे
* रिक्त जागांची भरती, शिक्षकेतर अनुदान आणि इतर मागण्यांसाठी राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचा शुक्रवारी लाक्षणिक बंद
* देशात अराजकसदृश परिस्थिती असताना जपानमध्ये मोदी चॉपस्टिक दांडिया खेळताना दिसत होते - सामनाचा अग्रलेख
* अराजक, यादवी शब्दांची धार बोथट वाटावी अशा घटना राष्ट्रीय स्तरावर घडत आहेत, टांगा पलटी घोडे फरार अशी दिल्लीतील राज्यवस्थेची अवस्था- शिवसेना
* सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन बंडाच्या तोफा उडवल्या, आता सीबीआयमध्ये बंड
* राज्यातील शासकीय सेवेतील आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी
* दुष्काळाचा सर्वांत जास्त त्रास महिलांना होतोय, पण सरकार निर्णय घेण्यास तयार नाही- ‌शरद पवार
* शबरीमला प्रकरणी केरळ सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, मात्र भाजपकडून विरोध- शरद पवार
* सीबीआयसारख्या संस्था वेठीस धरल्या जात आहेत, न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत- शरद पवार
* नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना-काँग्रेस आमदारांमध्ये धक्काबुक्की
* एफ़आरपी आधिक २०० दर देण्याची बुद्धी कारखानदारांना द्यावी- स्वाभिमानीचे ऊस, साखर आणि गुळाचा हार अर्पण करुन विठ्ठलाला साकडे
* मुंबई विद्यापीठाच्या ६०-४० परीक्षा पद्धतीला हायकोर्टाची स्थगिती, परीक्षा जुन्या पद्धतीनेच घेण्याचे विद्यापीठाला निर्देश
* अयोध्येत राममंदिर, शबरीमलात महिलांना प्रवेशबंदी, आरक्षणापेक्षा संरक्षण, आरक्षणात कालानुरूप बदल करा- ब्राह्मण महासंघ अधिवेशनात ठराव
* संगीतकार राम लक्ष्मण यांना 'लता मंगेशकर' पुरस्कार प्रदान
* यासाठीच सीबीआय सारख्या यंत्रणा लोकपालच्या कक्षेत असाव्यात- अण्णा हजारे
* नरेश पाटील यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ
* पाणी सोडण्यास विरोध वाढू लागल्याने नगर जिल्ह्यातील धरणातून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर
* रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी जानेवारीत, कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता मंदिरासाठी अध्यादेश काढा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
* मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यास १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफ़ी- राहुल गांधी
* जम्मू-काश्मीरमध्ये ०५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
* चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत ताशी १६० कि.मी. वेग असलेल्या 'ट्रेन १८' चं उद्घाटन
* दिल्लीत १५ वर्षांहून जुनी पेट्रोलची वाहने आणि १० वर्षांहून जुनी डिझेल वाहनांना सर्वोच्च न्यायालयाची बंदी
* 'फ्लिपकार्ट'ला चालू आर्थिक वर्षात ०२ हजार कोटींचा तोटा
* श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुना रणतुंगा यांना अटक, सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात पेट्रोलियम कर्मचार्‍याचा मृत्यू


Comments

Top