HOME   महत्वाच्या घडामोडी

उद्या शैक्षणिक बंद, १५१ तालुक्यात दुष्काळ, एसटी पुन्हा महागली, आज जायकवाडीला पाणी, ११ फुटी अजगर, भुजबळ म्हणतात मनुस्मृती जाळणारच! नायडूंची गांधी-पवार भेट......०१ नोव्हेंबर २०१८

उद्या शैक्षणिक बंद, १५१ तालुक्यात दुष्काळ, एसटी पुन्हा महागली, आज जायकवाडीला पाणी, ११ फुटी अजगर, भुजबळ म्हणतात मनुस्मृती जाळणारच! नायडूंची गांधी-पवार भेट......०१ नोव्हेंबर २०१८

* उद्या महाराष्ट्रव्यापी शैक्षणिक बंद
* राज्यातील २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, ११२ तालुक्यांत गंभीर आणि ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ
* जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांत सर्वाधिक दुष्काळी तालुके, लातूर जिल्ह्यात शिरुर अनंतपाळमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ
* आजपासून एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के दरवाढ
* आज जायकवाडीला कडक पोलिस बंदोबस्तात पाणी सोडणार
* ओलाउबेर टॅक्सीचालकांच्या संपाचा आज ११ वा दिवस, तोडगा निघेना, मुंबईकरांचे हाल
* कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज रात्री औरंगाबादेत
* अनुपम खेर यांचा एफटीआयच्या प्राचार्यपदाचा राजीनामा
* स्टॅच्यू ऑफ युनीटी हे सरदार पटेल यांचं सर्वात भव्य स्मारक जनतेसाठी आजपासून खुले
* १६ ते २६ नोव्हेंबर काळात आरक्षणासाठी राज्यभर संवाद यात्रा, नंतर हिवाळी अधिवेनावर मोर्चा
* भाजपला धोका दिसू लागल्यानं, भाजपला सेनेचा पुळका आलाय- उद्धव ठाकरे
* राफेल विमानाच्या खरेदीचा अहवाल १० दिवसात सादर करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
* रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवरुन मोदी सरकारशी मतभेद, गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देण्याची शक्यता
* चिपळूणमध्ये सापडला ११ फुटी अजगर
* श्रीगोंदा येथे समता परिषदेच्या व्यासपीठावर छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन
* सभेत एकवेळ मेणबत्ती पेटविणार नाही पण प्रत्येक सभेत मनुस्मृती जळणार- छगन भुजबळ
* आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- रामदास आठवले
* नगरमध्ये रस्त्यात दुचाकीला अपघात, अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले छगन भुजबळ
* मराठा सैनिकांबरोबर लढताना शत्रू थरथर कापतो, मराठा लाइट इन्फंट्रीच्या कार्यक्रमात बिपीन रावत
* पाकच्या घुसघोरीवर मात करण्यासाठी भारतीय लष्कर अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज- लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत
* एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात स्टेट बँक, अॅक्सेस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रची ०१ कोटी ४१ लाखाची फसवणूक, तिघांवर गुन्हा
* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज दिल्लीत भेटणार राहुल गांधी आणि शरद पवार यांना
* ‘एअरसेल-मॅक्सिस’ गैरव्यवहाराप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनास ईडीचा विरोध, चौकशीसाठी कोठडीची मागणी
* उत्तर प्रदेशातील हाशीमपूर हत्याकांड: १९८७ मध्ये मुस्लिम समाजातील ४२ जणांना गोळ्या घालून मारणार्‍या १६ पोलिसांना जन्मठेप
* जागतिक बँकेच्या व्यवसाय अनुकुलतेच्या सूचीत भारत १०० व्या स्थानावरून ७७ व्या स्थानावर
* जगभरात गोवरमुळे दरवर्षी ०१ लाख ३९ हजार मृत्यू, त्यापैकी ५० हजार मृत्यू भारतात
* लाचखोरीच्या आरोपावरून अटक झालेले सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना जामीन मंजूर
* प्रक्षोभक संदेश कुठून आला व कुणी पाठवला व्हॉट्सअॅपने स्पष्ट करावे, व्हॉट्सअॅपने तक्रारनिवारण अधिकारी भारतात नेमावा- रविशंकर प्रसाद
* दिल्लीत फक्त पर्यावरणपूरक फटाकेच फोडता येणार
* अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात येण्य़ासाठी लेखी आमंत्रण नव्हते- अमेरिकेचे स्पष्टीकरण


Comments

Top