HOME   महत्वाच्या घडामोडी

नरभक्षक वाघीणीला मारले, ४० जागांवर राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे एकमत, कोकणच्या मासळीवर बंदी, घटना कशाला आधी कॉंग्रेस वाचवा- आठवले, ०१ हजार एलेक्ट्रीक बस, ठाकरे बंधुतील वाद मिटला......०३ नोव्हेंबर २०१८

नरभक्षक वाघीणीला मारले, ४० जागांवर राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे एकमत, कोकणच्या मासळीवर बंदी, घटना कशाला आधी कॉंग्रेस वाचवा- आठवले, ०१ हजार एलेक्ट्रीक बस, ठाकरे बंधुतील वाद मिटला......०३ नोव्हेंबर २०१८

* पेट्रोल १९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त
* यवतमाळच्या जंगलातील नरभक्षक वाघीणीला मारण्यात वनविभागाला यश
* अनेक दिवसांपसून तिला पकडण्याचा प्रयत्न सुरु होता, वनविभागाने गोळी घालून मारले
* तासिका तत्वावर काम करणार्‍यांच्या मानधनात वाढ
* शिक्षक भरतीचे अधिकार पुन्हा आले संस्थाचालकांकडे
* लोकसभेच्या ४० जागांवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये एकमत
* राफेल प्रकरणी रिलायन्सला अकारण राजकारणात ओढले जात आहे- अंबानी
* महाराष्ट्र बॅंकेचे रवींद्र मराठे आणि आरके गुप्ता यांना पुन्हा अधिकार बहाल
* बोफोर्स प्रकरणी सीबीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
* नगरचे पाणी आज जायकवाडीकडे झेपावणार
* अक्कलकोटमध्ये वाळुचा अवैध उपसा करणार्‍या बोटी तहसीलदारांनी जाळून टाकल्या
* कोकणच्या मासळीवर गोव्यात बंदी
* मुंबईतील ओला, उबर चालकांचा बेमुदत संप परिवहनमंत्री दिवाकर रावतेंसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे
* मुस्लिम आरक्षणासाठी माळशिरस ते मुंबई पदयात्रा १८ दिवसांनी मुंबईत आझाद मैदानावर पोचणार
* डॉ. उद्धव भोसले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
* भगवानगडाचा खरा विकास आपणच केला, इतरांनी गडावर भाषणे ठोकून विकासाचा अभास निर्माण केला- महंत नामदेवशास्त्री
* संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा, संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान आणि आम्ही सक्षम आहोत- रामदास आठवले
* ठोस कारण न दिल्याने दाभोलकर प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला
* राज्यात धावणार ०१ हजार इलेक्ट्रिक बस
* बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी घेतली मागे
* केंद्राने राम मंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अन्यथा मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करू- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
* राज्यात शंभर बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश कायम राहणार, बांधकामांना संरक्षण देणारे कलम हायकोर्टाने ठरवले घटनाबाह्य
* नगर-औरंगाबाद महामार्गावर कार अडवून कापूस व्यापाऱ्याचे साडे आठ लाख लुटणारी पाच जणांची टोळी गजाआड
* मालेगाव स्फोट प्रकरण पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी
* मुंबईच्या डम्पिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथ परिसरात ३० एकर जागा द्या- हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
* पुलोत्सव १७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान, 'कृतज्ञता सन्मान' विकास आमटे यांना, तर 'तरुणाई सन्मान' कौशिकी चक्रवर्ती यांना जाहीर
* सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी अमित शहा यांच्या आरोपमुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली
* तामिळनाडुत दिवाळीत सकाळी ०६ ते ०७ आणि सायंकाळी ०७ ते ०८ वाजेपर्यंत फटाके फोडता येणार
* सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शहा यांची मुंबईत राम मंदिर आणि शबरीमला मंदिर मुद्यावर चर्चा
* दिल्लीत इंडिया गेटजवळ नेताजींचाही पुतळा उभारा, नेताजींच्या जयंतीला २३ जानेवारीला घोषणा करावी नेताजींच्या नातेवाईकांची मागणी
* अयोध्येत श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारणार- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
* काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी, श्रीनगर-लडाख महामार्गासह जम्मूकडे जाणारी वाहतूक बंद, २४ तासांत आणखी बर्फवृष्टी होणार
* लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव पत्नी ऐश्वर्या रायला देणार घटस्फोट
* पंतप्रधान चौकशीला घाबरतात, मोदींनी अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा करुन दिला- राहुल गांधी
* विधानसभा निवडणूक: भाजपची मध्य प्रदेशसाठी १७७, मिझोरमसाठी २४ तर, तेलंगणासाठी २८ उमेदवारांची यादी जाहीर
* लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मिळणार ५९ मिनिटांत ०१ कोटीपर्यंतचे कर्ज
* काँग्रेसच्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातले सर्वात लोकप्रिय उमेदवार, राहुल गांधींची लोकप्रियताही वेगाने वाढली असल्याची नोंद
* स्वदेशी पेमेंट नेटवर्क 'रुपे'ला प्राधान्य देण्याचा मोदी सरकारचा निर्णय, मास्टरकार्ड'ची या संदर्भात ट्रम्प सरकारकडे तक्रार
* कोणत्याही देशाच्या सरकारने तेथील मध्यवर्ती बँकेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू नये- रिझर्व्ह बँक-सरकार वादावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
* तालिबानचा 'गॉड फादर' मौलाना समी-उल हक पाकिस्तानात मारला गेल्याचे वृत्त
* इराणवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही भारताला त्यांच्याकडून इंधन आयात करता येईल- अमेरिकेचे स्पष्टीकरण
* मराठवाडा विद्यापीठाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत देशातील ११२ विद्यापीठाचा सहभाग


Comments

Top