HOME   महत्वाच्या घडामोडी

नक्षलवादी क्रांतीकारी? फटाके रात्री ०८ ते १०, बिबट्याने घेतले १८ बळी, डिसेंबरात राम मंदीर, १२ शेतकर्‍यांना लॅपटॉप, सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु.......०५ नोव्हेंबर २०१८

नक्षलवादी क्रांतीकारी? फटाके रात्री ०८ ते १०, बिबट्याने घेतले १८ बळी, डिसेंबरात राम मंदीर, १२ शेतकर्‍यांना लॅपटॉप, सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु.......०५ नोव्हेंबर २०१८

* लातुरच्या ग्रॅंड हॉटेलमध्ये वेटरवर गोळीबार, मांडीत गोळी घुसली, असे काहीच घडले नसल्याचा हॉटेलचा दावा
* रात्री आठ ते दहा दरम्यानच फटाके वाजवता येणास
* राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट
* फटाके फोडण्याचा प्रत्न झाल्यास आठ दिवसांचा कारावास
* पेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त
* आज विराट कोहलीचा वाढदिवस
* मुंबईत म्हडाच्या १३८०० घरांची लॉटरी, आजपासून अर्ज करता येथील
* ५१ हजार दिव्यांनी सजला शनिवारवाडा
* गोव्यात ४० फुटी कंदील
* आज रंगभूमीदिन
* विठ्ठलाला सोन्याचे धोतर उंची हिरे जडीत दागिन्यांनी सजवले
* टी वन वाघिणीच्या हत्त्येबद्दल मनेका गांधी नाराज, सुधीर मुनगंटीवारांवर आगपखड
* भारताची महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या बीएसएफ जवानाला अटक
* नक्षलवादी हे क्रांतीकारी- राज बब्बर
* डिसेंबरमध्ये राम मंदिराचे बांधकाम सुरु करणारच- संत संमेलन
* दोन पेक्षा अधिक मुले असणार्‍यांचा मतदानाचा अधिकर कढून घ्या- बाबा रामदेव
* शेतीत उत्तम कामगिरी केलेल्या १२ शेतकऱ्यांना आज राज्यपाल देणार लॅपटॉप, एका महिला शेतकर्‍याचा समावेश
* रेल्वे तिकीट एजंटांचे गैरप्रकार रोखण्यासाठी देशभरात धडक मोहीम, १०० शहरांतील ८९१ दलाल गजाआड, ५ कोटी ७५ लाखांची तिकिटे जप्त
* पुणे आणि औरंगाबाद मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा तर नगरच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह
* दहाहून अधिक कर्मचारी असलेली राज्यातील रुग्णालये आणि नर्सिग होम्सना दुकाने व आस्थापना अधिनियम लागू
* रुग्णालय कर्मचाऱ्यांना मिळणार भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, महिला कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रात्रपाळी आणि सुरक्षित सेवा
* कोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती, राज्यभर सध्या ढगाळ वातावरण, दोन ते तीन दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज
* जुलैमध्ये घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाचा निकाल रखडला
* प्रकाश आंबेडकरांनी कोणतीही भूमिका घेतली तरी फायदा माझाच, ते विचारवंत, मी रस्त्यावरचा फिल्ड वर्कर- रामदास आठवले
* औरंगाबादमध्ये इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलला जेमतेम प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्या पाहून रामदास आठवले झाले नाराज
* याच मैदानावर रिपाइंचा मेळावा घेऊन लाखोंची गर्दी जमवण्याचा आठवलेंचा निर्धार
* सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू, कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, संभ्रमासाठी विरोधकांच्या वावड्या- अजित पवार
* मुळा धरणातून जायकवाडी धरणाला सोङण्यात आलेले पाणी झाले बंद
* ताडोबा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, चालू वर्षातला १८ वा बळी
* औरंगाबादमध्ये अवैध धंद्याची तक्रार केल्याने तरुणावर सात जणांचा प्राणघातक हल्ला, पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल
* वर्धा येथे विद्यार्थिनीचा 'हिपेटायटीस बी' लसीकरणाची १२ विद्यार्थिनींना रिअॅक्शन, एकीचा मृत्यू
* सरकारच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्या झाल्या मालामाल- काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
* लोक म्हणतात अलाहाबादचं नाव का बदलले? नावात काय असतं? तुमच्या आई-बापांनी तुमचं नाव दुर्योधन का नाही ठेवलं?- योगी आदित्यनाथ
* नरेंद्र मोदी म्हणजे अॅनाकोंडा, सीबीआय, आरबीआयसह सर्वच संस्थांना गिळंकृत करत आहेत- आंध्रचे अर्थमंत्री यन्मला
* राम मंदिर आंदोलनात मी सक्रिय सहभागी होते, मंदिर व्हावं हे माझं स्वप्न, त्यासाठी वाटेल ते करायला तयार - उमा भारती
* सहेतूक कर्जबुडव्यांची यादी जाहीर न केल्याने रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना कारणे दाखवा नोटीस
* टी-२०: भारताचा विंडीजवर पाच गडी राखून विजय


Comments

Top