HOME   महत्वाच्या घडामोडी

मनेकाविरुद्ध मुनगंटीवार संघर्ष, १५ हजार अब्जांच्या नोटा नष्ट, बसस्थानकात फराळ, ०७ हजार कोटींची मागणी, चिल्लर घेण्यास बॅंकांचा नकार, अयोध्येत तीन लाख दिवे.......०७ नोव्हेंबर २०१८

मनेकाविरुद्ध मुनगंटीवार संघर्ष, १५ हजार अब्जांच्या नोटा नष्ट, बसस्थानकात फराळ, ०७ हजार कोटींची मागणी, चिल्लर घेण्यास बॅंकांचा नकार, अयोध्येत तीन लाख दिवे.......०७ नोव्हेंबर २०१८

* मारुती महाराज साखर कारखान्याच्या चेअरमनपदी गणपती बाजुळगे तर व्हाईस चेअरमनपदी शाम भोसले
* लातूर बसस्थानकात एसटी कर्मचार्‍यांनी केलं दिवाळी फराळाचं वाटप
* लातूर शहराच्या बाहेरुनच राष्ट्रीय महामार्ग जाणार
* रिक्त पदांवर सामावून घेण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे उपोषण
* १५ हजार ३१० अब्ज किमतीच्या बंद झालेल्या नोटा आरबीआयने केल्या नष्ट
* फैजाबाद आता श्री अयोध्या- आदित्यनाथ यांची घोषणा
* आज लक्ष्मीपूजन संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ एवढाच मुहूर्त
* मुगंटीवारांचे वनमंत्री काढून घ्या- मनेका गांधी
* महिला-बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून मनेका गांधींनी राजीनामा द्यावा- सुधीर मुनगंटीवार
* दुष्काळासाठी केंद्राकडे ०७ हजार कोटींची मागणी, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होऊ शकेल- मुख्यमंत्री, उस्मानाबादेत
* आजपासून सलग पाच दिवस राज्य सरकारी कार्यालये सुट्टीमुळे बंद
* राज्यातील दुष्काळग्रस्त १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क माफ
* अवनी वाघिणीची हत्या, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हकालपट्टी करा- मनेका गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
* अवनीला ठार केल्याबद्दल टीका करणाऱ्या मनेका गांधींची भूमिका शेतकरी व आदिवासी विरोधी- वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशन
* स्वाभिमानी, माकप, सपा व बसप या पक्षांना सोबत घेण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रयत्न, सपाची मुंबईत एका जागेची मागणी
* राज्यातील सात औष्णिक प्रकल्पांच्या मोकळ्या जागेत एक हजार मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा ऊर्जा विभागाचा विचार
* अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी ‘गेट’ देण्याचे बंधन नाही
* बेकायदा विक्री व हस्तांतरित जमीनी देवस्थानांच्या ताब्यात देण्याचा राज्य शासनाचा निर्णय
* भिमा कोरेगाव चौकशी दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपी अरुण परेराचा पुणे सत्र न्यायालयात आरोप
* कथित नक्षली संबंध असल्याचा आरोप असलेले सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वर्नोन गोन्साल्विस यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
* पुणे महानगर परिवहन महामंडळाची २० लाख रुपयांची चिल्लर स्विकारण्यास बँकेचा नकार
* पुण्यात पत्नीचे वजन वाढल्यामुळे तिला उपाशी ठेवणार्‍या पतीविरुध्द गुन्हा दाखल
* २०११ पर्यंतच्या मुंबईसह सर्व शहरातील झोपड्या कायदेशीर करा- रामदास आठवले
* मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वर्षांच्या मुलाला पळविणारी महिला पोलिसांच्या ताब्यात
* पुणे देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे सातवे शहर, वाहतूक संथ असणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे विसावे
* औरंगाबादेत अल्पवयीन मुलीला कारमध्ये बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करणारा आरोपी वकील कोठडीत
* औरंगाबादेत विनापरवाना फटाके विकणाऱ्या दोघांना अटक, ३१ हजारांचे फटाके जप्त
* पुणे परिसरातिल धायरी गावात ट्रकने उडवले ०५ दुचाकींना, अपघातात १० जण जखमी
* अयोध्येत तीन लाख दिवे उजळवून विश्वविक्रम
* नीरव मोदीच्या दुबईतील ११ मालमत्ता ईडीने केल्या जप्त
* छत्तीसगडमध्ये ६२ नक्षलवाद्यांचे ५१ देशी बनावटीच्या शस्त्रांसह आत्मसमर्पण
* तेलंगणात तेलंगण राष्ट्र समितीचे नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या
* पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक
* शबरीमला मंदिरात महिला भाविकाने पोलीस संरक्षणात कुटुंबासह घेतले दर्शन, निदर्शकांची पत्रकारांना मारहाण
* रिझर्व्ह बँकेचे कार्य कारच्या सीट बेल्टप्रमाणे, सरकार बँकेला झुकवू पहात असेल तर बँकेने ठाम नकार द्यायला हवा- रघुराम राजन


Comments

Top