HOME   महत्वाच्या घडामोडी

केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन, उर्जामंत्र्यांच्या भाषणावेळी वीज गायब, छत्तीसगडमध्ये आज मतदान, आता भारनियमन नाही, विठ्ठल दर्शन २४ तास, अक्षयला समन्स.......१२ नोव्हेंबर २०१८

केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन, उर्जामंत्र्यांच्या भाषणावेळी वीज गायब, छत्तीसगडमध्ये आज मतदान, आता भारनियमन नाही, विठ्ठल दर्शन २४ तास, अक्षयला समन्स.......१२ नोव्हेंबर २०१८

* भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सांसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे निधन
* अनंतकुमार सहावेळा खासदार म्हणून आले होते निवडून
* अभिनेता नवाजोद्दीन सिद्दीकीही अडकला मीटूच्या भानगडीत
* यवतमाळमध्ये उर्जामंत्री यांचे भाषण सुरु असतानाच वीज गायब!
* मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बस पेटली, चालकानं प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरवल्यानं अनर्थ टळला
* बछड्यांसह ताडोबा अभयारण्यात फिरणार्‍या माया वाघीणीचा रस्ता पर्यटकांनी अडवला
* छत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, नक्षलवद्याद्यांनी घडवले सहा बॉंबस्फोट
* सिमेवर लढताना नाशिकचा केशव गोसावी जवान शहीद
* आम्ही २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याचे घोषित करताच विहिंप आणि संघाला कशी जाग आली? उद्धव ठाकरे यांचा सवाल
* आधी बाळासाहेबाचं स्मारक बनवा मग अयोध्येचं बघा- विहिंप
* आता भारनियमन होणार नाही, कोळशाचे नियोजन झाले- उर्जामंत्री बावनकुळे
* ठाण्याच्या नगरसेवक पुत्राने केला हवेत गोळीबार
* सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटकांची गर्दी
* पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
* दोनशेपेक्षा कमी सभासद संख्या असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रियेतून सुटका
* कार्तिकी यात्रेसाठी आजपासून पंढरपुरचे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी राहणार चोवीस तास खुले
* सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले ठिय्या आंदोलन
* ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचे औरंगाबाद येथे निधन
* पुण्यात महाविद्यालयीन निवडणुका लढविल्या, पुण्याच्या त्या निवडणुका हाच माझ्या राजकारणाचा पाया- शरद पवार
* आता निवडणूक लढणार नाही- शरद पवार
* कोल्हापूर परिसरात दोन गटांत पूर्ववैमनस्यातून हाणामारी, आठजण गंभीर जखमी
* २५ नोव्हेंबरला हिंदुत्वाचा एल्गार बाळासाहेबांनी पेटवला होता, भाजप, संघाची ‘हुंकार रॅली’ बाळासाहेबांच्या एल्गाराचाच भाग
* २५ नोव्हेंबरला जर अयोध्येत क्रांतीच्या ज्वाला पेटणार असतील तर आम्ही कोणताही मुहूर्त न पाहत या उपक्रमात सहभागी
* अयोध्या दौऱ्यासाठी कोणी कितीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेच्या वारीत बदल होणार नाही- शिवसेना
* लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न असल्याने सगळ्यांनी मिळून राम मंदिर उभारावे- शिवसेना
* मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा पथनाट्यांद्वारे प्रचार
* ७० चित्रपटांनंतरही राष्ट्रीय पुरस्कार नाही, कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकही चित्रपट दाखवला गेलेला नाही- शाहरुख खानची खंत
* तीन वर्षांपूर्वी ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याप्रकरणी अक्षय कुमारला समन्स
* जम्मू-काश्मीरमध्ये १६० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात, लष्कराकडून हायअलर्ट जाहीर
* शाह संस्कृत नव्हे तर पारसी शब्द, भाजप शहरांचे नामकरण करत आहे तर त्यांनी आपल्यापासूनच सुरुवात करावी- इतिहास अभ्यासक प्रा. इरफान हबीब,
* पासपोर्टचे नियम शिथील, भारतीयांशी लग्न करणाऱ्या पाकिस्तानी महिलांनाही मिळणार पासपोर्ट
* महिला टी-२० वर्ल्डकप- भारताचा पाकिस्तानवर ०७ गडी राखून विजय


Comments

Top