HOME   महत्वाच्या घडामोडी

समृद्धी महामार्ग ठाकरे की वाजपेयी? मराठा आरक्षण अहवाल उद्या, शबरीमलावर फेरविचार, अलोकनथांची हकालपट्टी, यंदा साखर उत्पादन कमी..............१४ नोव्हेंबर २०१८

समृद्धी महामार्ग ठाकरे की वाजपेयी? मराठा आरक्षण अहवाल उद्या, शबरीमलावर फेरविचार, अलोकनथांची हकालपट्टी, यंदा साखर उत्पादन कमी..............१४ नोव्हेंबर २०१८

* लिव्ह इन रिलेशन असताना प्रेयसीने दिला नकार, दोघांच्याही हाताच्या नसा कापल्या, पुण्यातला प्रकार
* इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या टीव्हीची इमारत उध्वस्त
* मराठा आरक्षण अहवाल उद्या सादर होणार
* राज्यात ४६ हजार कुटुंबांचा केला होता सर्वे
* शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यच्या मुद्द्यावर फेर विचार याचिका, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, २२ ला निर्णय
* समृद्धी महामार्गाला वाजपेयींचं तर याच मार्गाला बाळासाहेबांचं द्या, भाजप-शिवसेनेमध्ये संघर्ष
* मीटू प्रकरणी आलोकनाथ यांची कलावंत संघटनेतून हकालपट्टी
* कोल्हापुरात १५ रुग्णालयांवर छापे, केंद्रीय पथकाची कारवाई, अर्भकांची बेकायदा विक्री आणि बेकायदा गर्भपातांचा संशय
* चंद्रपुरातील फसलेली दारुबंदी मागे घ्या- शिवसेना
* यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता, ९०-९५ लाख टनाचा अंदाज
* औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करा- सेनेच्या मंत्र्यांची मागणी
* भिमा कोरेगावातील हिंसाचार प्रकरणी शासनाला कोणते आदेश दिले? मुख्यमंत्र्यांना चौकशी आयोगासमोर बोलवा- प्रकाश आंबेडकर
* कोरेगाव भीमा हिंसाचार: चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख
* राम मंदिर बांधून पोट भरणार असेल तर आमचा पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
* उद्धव ठाकरेंची २५ तारखेची अयोध्या भेट निरर्थक, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतांसाठी ठाकरेंची भेट- अशोक चव्हाण
* राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले ६५ वर्ष
* देशात विविध जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा उद्योग सुरू, सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत- शरद पवार
* पंतप्रधान आवाससाठी राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय
* अवनीची शिकार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना माज, २०१९ मध्ये राज्यच त्यांची शिकार करेल- राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून हल्ला
* मुंबईतील अंधेरी वीरा देसाई मार्गावर इमारतीला आग, तिघांची सुटका, दोघांचा मृत्यू
* ह्रदयनाथ मंगेशकरांना पु.ल. जीवनगौरव, पु.ल. स्मृती पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना तर डॉ. जयंत नारळीकर व शि. द. फडणीसांचा विशेष सन्मान
* भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्षात गुंडांना प्रवेश देतात, मते वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश दिल्याची वक्तव्ये करतात - अनिल गोटे
* गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती, ते हयात असते तर असे धाडस केले असते का?- गोटेंचा प्रश्न
* ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे कर्नाटकासह मराठवाडा व विदर्भातून ज्वारी आणण्याची गरज
* चंद्राबाबू नायडू १९ नोव्‍हेंबर रोजी भेटणार कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांना
* गोध्रा घटनेनंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान, १९ नोव्हेंबरला सुनावणी
* आगामी निवडणुकांमध्ये माकप आणि द्रमुक यांची आघाडी- माकपचे सीताराम येचुरी
* व्हिसा, मास्टर कार्ड आणि जागतिक ग्लोबल पेमेंट कंपन्यांना भारतात मिळणार्‍या उत्पन्नावर भरावा लागणार पंधरा टक्के कर
* सरकारमध्ये बसलेले लोक पंडित नेहरूंची लोकशाही मूल्ये कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत- सोनिया गांधी
* रविशंकर अयोध्येत मशीद बांधण्याची योजना आखत आहेत, त्यासाठी त्यांनी काही लोकांशी चर्चादेखील केली- अयोध्या सद्भावना समिती


Comments

Top