logo
news image पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक news image पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार news image नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार news image राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री news image दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा news image हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा news image पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना news image आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी news image पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन news image पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स news image पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून news image जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द news image पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना news image पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक

HOME   काल, आज आणि उद्या

राजीनामे दिलेच नाहीत! आज मुंबई हल्ल्याची दशकपूर्ती, मुंबईवर पाच हजार कॅमेर्‍यांची नजर, भागवत आणणार राम मंदिरासाठी दबाव, मराठ्यांचे रोखठोक सुरु......२६ नोव्हेंबर २०१८

राजीनामे दिलेच नाहीत! आज मुंबई हल्ल्याची दशकपूर्ती, मुंबईवर पाच हजार कॅमेर्‍यांची नजर, भागवत आणणार राम मंदिरासाठी दबाव, मराठ्यांचे रोखठोक सुरु......२६ नोव्हेंबर २०१८

* लातुरचे महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, तीन स्विकृत सदस्य यांनी राजीनामे दिल्याची चर्चा
* स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळले
* शैलेश गोजमगुंडे यांनी महिनाभरापूर्वीच पालकमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याची बातमी
* दानवेंनी लातुरात घेतलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत फक्त राजीनाम्याची चर्चा, मनपातील विश्वासू सुत्रांची माहिती
* २६/११ च्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण, मुख्य सूत्रधार मात्र मोकाटच
* २६/११: मुंबईवर ०५ हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर
* राम मंदिर निर्मितीसाठी सरकारवर जनतेचा दबाव आणणार- मोहन भागवत
* मंदिर ही कोर्टाची बाब नाही, लवकर निर्णय व्हायला हवा- भागवत
* मध्यप्रदेशात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस
* जळगावात पाण्याअभावी अनेक शेतकर्‍यांनी कापूस उपटून फेकला
* मराठा समाजाची संवाद यात्रा आज विधानसभेवर
* बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे रोखठोक आंदोलन सुरु
* सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण
* दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार
* प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलल्याने विद्यार्थ्यांची सोय
* मुंबईच्या वेशीवर पुन्हा धडकला शेतकर्‍यांचा मोर्चा, मोर्चाला ठाण्यातच रोखलं
* २६/११ च्या सूत्रधारांना पकडून देणार्‍यांना अमेरिकेने जाहीर केले मोठे बक्षीस
* ठाणे जिल्ह्यात हरिश्चंद्रगड येथे अडकले कल्याणचे २० ट्रेकर्स
* गांधी परिवार, काँग्रेसवर आरोप करणे थांबवा, राममंदिरास अडथळा झाल्यानेच लोकांनी त्यांना बेदखल केले- सामनाचा अग्रलेख
* रामाने तुमचे मनोरथ सफल केले बदल्यात राम अखंड वनवासी राहणार असेल तर राजकीय नौटंकी बंद करा- सामनातून ठणकावले
* लोकांनी रामराज्य मागितले होते, राममंदिर नव्हे- राज ठाकरे
* ज्यांनी उत्तर भारतीयांना हुसकावलं ते राम मंदिराबाबत कसं काय बोलू शकतात?- भाजप नेते सुरेंद्र सिंहांचा शिवसेनेला सवाल
* अयोध्येत शिवसेनेची शाखा स्थापन
* राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यायचाय तर निवडणुकीत याचा वापर करू नका- उद्धव ठाकरे
* उद्धव ठाकरे यांना प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद मिळावेत- मुख्यमंत्री
* उत्खननात अयोध्येत बुद्ध मंदिर असल्याचे आढळल्याने राम मंदिर, मशिदीबरोबरच बुद्ध मंदिर उभारा- रामदास आठवले
* राममंदिराला पाठिंबा मात्र हे मंदिर बेकायदा उभारू नये- रामदास आठवले
* स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळासह इतर मागण्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा अन्यथा राज्यभर आंदोलन - राज्य ब्राह्मण समाज
* इतर आरक्षणाला धक्का न लावता ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा ०१ डिसेंबरपासून राज्यभर आंदोलन- मराठा क्रांती ठोक मोर्चा
* आंदोलन कशा प्रकारचे असेल हे आम्ही सांगणार नाही, आंदोलनाला राज्य सरकार असेल जबाबदार- मराठा क्रांती ठोक मोर्चा
* बदल्यांवर नियमन असताना पुढाऱ्यांच्या शिफारशींवरुन राज्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्या का केल्या जातात?- उच्च न्यायालय
* बदल्यांसंदर्भात राज्य मुख्य सचिवांना ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
* राज्यात विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन गावांमध्ये होणार समलिंगी मराठी साहित्य संमेलन
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यभरातील १२३ केंद्रांवर आजपासून परीक्षा, परीक्षांवर सीसीटीव्हीची नजर
* जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर पुण्यात दोन स्फोट, पुणे अजूनही दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट
* शेतीत काहीच मिळत नाही मी जीवनाला हरलो असे चिठ्ठीत लिहून नाशिक जिल्ह्यात तरुण द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या
* चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात ०८ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
* पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले रमेश महाले यांच्या '२६/११ कसाब आणि मी' पुस्तकाचे प्रकाशन
* अयोध्येतील शरयू नदीत नागरिकांना सापडल्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या कागदी होड्या- राधाकृष्ण विखे पाटील
* शाहीर विठ्ठल उमप स्मृती 'मृद्गंध' पुरस्कारावरून उमप बंधूंमध्ये वाद
* पुणे येथे पुलोत्सवात उस्ताद झाकिर हुसेन यांना 'पुलं स्मृती सन्मान' प्रदान
* विहिंपची धर्मसभा, उद्धव ठाकरेंचा दौरा या सर्वोच्च न्यायालयास थेट आव्हान देणाऱ्या- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
* सार्वजनिक इंधन कंपन्यां उभारणार देशभरात ६५ हजार पेट्रोल पंप
* काँग्रेसकडून जातीय राजकारणाला खतपाणी, काँग्रेस सर्व प्रकारचे सौजन्य विसरलाय- नरेंद्र मोदी
* दिवाळखोरीविरोधी कायद्याच्या माध्यमातून दोन वर्षांत तब्बल ०३ लाख कोटींची थकीत कर्ज प्रकरणे मार्गी


Comments

Top