HOME   महत्वाच्या घडामोडी

सात पोलिस ठण्यांना मिळणार नव्या वास्तू, औसा बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त, अंगणवाडीत मोफत आरोग्य सेवा, कमलनाथांना पसंती, मीच गृहमंत्री- पंकजा.......१३ डिसेंबर २०१८

सात पोलिस ठण्यांना मिळणार नव्या वास्तू, औसा बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त, अंगणवाडीत मोफत आरोग्य सेवा, कमलनाथांना पसंती, मीच गृहमंत्री- पंकजा.......१३ डिसेंबर २०१८

* पॉवर फॅक्टर काढण्याच्या पध्दतीत बदल, लातुरच्या एमआयडीसीतील उद्योजकांचा वीज बील न भरण्याचा निर्णय
* लातूर जिल्ह्यात सात ठिकाणच्या पोलिस ठाण्यांना मिळणार नव्या वास्तू
* लातुरातील जिल्हा परिषदेच्या खराब रस्त्यांची होणार चौकशी, अध्यक्षांचे आदेश
* उदगीरच्या पोलिस ठाण्यात गोंधळ घालणार्‍या नगरसेवक पुत्राविरुद्ध गुन्हा
* अंबाजोगाई मार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक
* औसा बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकपदी मधुकर गुंजकर
* अमित शहा यांनी आज बोलावली सर्व प्रदेशाध्यक्षांची बैठक
* पंतप्रधान मोदी यांनी बोलावली सर्व भाजपा खासदारांची बैठक
* पिंपरीत सावत्र सहा आणि आठ वर्षांच्या बालकांना सावत्र आई वडिलांनी सळईने केली बेदम मारहाण गरम उलथण्याचे चटके
* एका तरुणाने हस्तक्षेप केल्याने आई-वडिलांना पोलिसांनी केली अटक
* अंगणवाडीतील १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांना सर्व आरोग्य सेवा मिळणार मोफत
* आरक्षणासाठी सरकारच्या निषेधार्थ मनमाडमध्ये धनगर समाजाने उभारल्या काळ्या गुढ्या
* बीडमधील गॅंगवॉर मीच संपवलं, बीडमध्ये मीच गृहमंत्री- पंकजा मुंडे
* मध्यप्रदेशात शिवसेनेने मते मिळवल्याने अनेक भाजपा उमेदवार पराभूत
* मध्यप्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदासाठी मोठा पाठिंबा
* राजस्थान आणि मध्य प्रदेशातील नव्या मुख्यमंत्र्यांची नावे आज होणार निश्चित
* अभियोक्ता चाचणी होऊनही अद्याप शिक्षक भरती नाही
* सटाण्यात कांद्याला दीड रुपयांचा भाव, दिला रस्त्यावर फेकून, केला रास्ता रोको
* अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज स्मृतीदिन
* तेलंगणात आज चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
* आरक्षण जाहीर केल्यानंतर जालन्यात देण्यात आलं पहिलं जात प्रमाणपत्र
* नाशिकात आरक्षण मिळाल्याबद्दल १५ डिसेंबरला आनंदोत्सव
* सुप्रिया सुळे यांची संसदेच्या गटनेतेपदी निवड
* बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटाचं डबिंग सुरु, मराठीत सचिन खेडेकरांचा आवाज
* लोकसभेत आज चार लाख कोटींच्या कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता, आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी
* नैसर्गिक जलसाठ्यातून अनधिकृत पाणी उपसा केल्यास फौजदारी खटला, जिल्हाधिकारी करणार कारवाई
* व्हाटसअ‍ॅपवरील ग्रुपमध्ये परवानगीविना कुणालाही अ‍ॅड करता येणार नाही
* शिवसेनेशी युती केल्याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पर्याय नसल्याची राज्यात भाजप नेत्यांची चर्चा
* भाजपला पर्याय काँग्रेस, सार्वत्रिक निवडणुकांनंतर राजकीय चित्र बदलेल- शरद पवार
* हा पराभव पंतप्रधानांचाच, राहुल गांधींनी विजय नम्रपणे स्वीकारला- शिवसेना
* नेहरू गांधीसारखेच भाजप उभारणीतले लालकृष्ण आडवाणी व इतर कुणीच मोदींना मान्य नाही, असा अहंकार फक्त महाभारतात दिसला- शिवसेना
* मोदी-शहांसारख्या दिग्गजांपासून ते भाजपातील गल्लीबोळातील पोरेटोरेही ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चे नारे देत होते- शिवसेना
* राहुल गांधी यांनी त्यांच्या घरात घुसून मारले, काँग्रेसला श्रद्धांजली वाहताना न थकणारे आज मूकबधिर झाले- शिवसेना
* नरेंद्र मोदी हे विष्णूचा तेरावा तर अमित शहा हेच मूळ चाणक्य, त्यांचा पराभव होणार नाही असे भक्तगणांना वाटत होते-शिवसेना
* औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला केंद्रीय वन पर्यावरणची स्थगिती
* राज्यात बोगस पॅथॉलॉजींवर अंकुश नसल्याने रुग्णांची लूट, सामान्यांच्या आरोग्याला धोका, बोगस पॅथॉलॉजीवर कारवाई करा- पॅथॉलॉजिस्ट संघटना
* इंजिनीअरिंगसाठी होणारी प्रवेशपरीक्षा यावर्षीपासून होणार ऑनलाइन
* कोल्हापुरात दुसरीही मुलगीच झाली म्हणून तिला आई- वडिलांनीच विष दिल्याचे उघडकीस
* नगर महापालिका निवडणुकीत रिक्षाचालकाची पत्नी झाली नगरसेविका
* पाणीकपातीमुळे मुंबईत नगरसेवक आक्रमक, पाण्यासाठी मांडला स्थायी समितीत ठिय्या
* मराठा आंदोलनानंतर चाकणमध्ये पोलिस ठाणे पेटवण्याच्या प्रकारात मराठा आंदोलकांचा संबंध नाही- पोलिस आयुक्‍त
* पुण्यात व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख झालेल्या विवाहितेवर बलात्कार, महिलेची पोलिसांत तक्रार
* आरबीआयसाठी काम करणं माझ्यासाठी देशसेवेची उत्तम संधी- शक्तिकांत दास
* आज सार्वजनिक बँकांचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांची मुंबईत बैठक- शक्तिकांत दास
* पुणे येथे ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास शानदार सुरुवात, महोत्सव चालणार पाच दिवस
* इंटर नॅशनल स्टुडंट फ़ेस्टिवलमध्ये एफटीआयआयच्या रमेश होलबोले दिग्दर्शित आगासवाडी माहितीपटाला प्रथम पारितोषिक
* ईशा अंबानीच्या लग्नात गृहमंत्री राजनाथ सिंह, ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती
* संसद भवानाबाहेर शिवसेना खासदारांनी दिल्या घोषणा ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’
* शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत मांडला राम मंदिराचा स्थगन प्रस्ताव
* लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन
* लढाई संपली आता काम करण्याची वेळी- ज्योतिरादित्य सिंधीया
* राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी माझ्या नावाचा वापर- रॉबर्ट वाड्रा
* रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांच्या निवडीला भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा विरोध
* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भेटले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना
* मीटू प्रकरण- इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनकडून दिग्दर्शक साजिद खानवर एक वर्षाची बंदी
* सरदार वल्लभभाई पटेलांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' असलेल्या गुजरातमधील केवडिया शहरात पर्यटकांच्या सोयीसाठी होणार रेल्वे स्टेशन
* भाजपा केवळ दोघांच्या तालावर नाचणारा पक्ष होऊन बसला आहे- यशवंत सिन्हा
* हॉकी वर्ल्डकप- उपांत्यपूर्व फेरीत भारत आणि नेदरलँड यांच्यात सामना


Comments

Top