HOME   महत्वाच्या घडामोडी

मंगेश बिराजदार लातुरचे परिवहन सभापती, उजनीचं पाणी विषारी? प्रसादामुळे १३ जणांचा मृत्यू, भिडेंच्या सभेला मनाई, विद्यार्थ्यांना मोफत जेवण, नेपाळमध्ये भारतीय चलनाला बंदी, रामनगरीला ठाकरेंचा विरोध.......१५ डिसेंबर २०१८

मंगेश बिराजदार लातुरचे परिवहन सभापती, उजनीचं पाणी विषारी? प्रसादामुळे १३ जणांचा मृत्यू, भिडेंच्या सभेला मनाई, विद्यार्थ्यांना मोफत जेवण, नेपाळमध्ये भारतीय चलनाला बंदी, रामनगरीला ठाकरेंचा विरोध.......१५ डिसेंबर २०१८

* मंगेश बिराजदार लातुरचे परिवहन सभापती
* राहूल गांधी यांनी देशाची जनता आणि लष्कराची माफी मागावी- अमित शाह
* राफेल विमान खरेदीबाबत अद्याप कसलाही अहवाल आलेला नाही- कॅग
* छत्तीसगडच्या मुख्यमंत्री निवडीबाबत आज दिल्लीत बैठक
* पानसरे प्रकरणाचा निकाल कधी लागणार? बड्या व्यक्तींना संरक्षण देऊ नका- उच्च न्यालय
* पुण्यात भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानात तीन महिलांनी केला ज्वेलर्सच्या दुकानात दागिन्यांवर हात साफ
* पुण्यात होणार दोन दिवसाआड पाण्याचा पुरवठा
* कर्नाटकात मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने १३ जणांचा मृत्यू
* नेपाळमध्ये भारताच्या २००, ५०० आणि दोन हजार नोटा स्विकारणे झाले बंद
* आंध्र आणि तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा
* नागपुरात महिलांनी मॉर्निंग वॉकला जाणे केले बंद, अज्ञात मारेकर्‍याच्या हल्ल्याची भिती
* मुंबईच्या विलेपार्लेत भिडे गुरुजींच्या सभेला परवानगी नाकारली
* लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विचार
* माल्याप्रकरणी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास- नितीन गडकरी
* उजनीचं पाणी पिल्यानं कॅन्सर होण्याची शक्यता, पाण्यात नावश्यक घातक घटक
* प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा
* मराठवाडा विद्यापीठ दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना ०५ महिने देणार मोफत जेवण
* काँग्रेसबरोबर बोलण्याची अजूनही इच्छा, बोलणीस वरिष्ठांची परवानगी आहे की नाही याचा खुलासा अशोक चव्हाणांनी करावा- प्रकाश आंबेडकर
* मल्ल्याचे ४० वर्षे खाते सुरळीत होते, ४१ व्या वर्षात बुडाले, व्यवसायात चढउतार येतात- गडकरींचे दुसरे विधान
* शासकीय सेवेतील रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द करावा- धनंजय मुंडे
* राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले जळगावमध्ये, पारा गेला १० अंश सेल्सिअस
* १८ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यावर नरेंद्र मोदींनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा- राधाकृष्ण विखे पाटील
* मलबार हिलचे नामकरण 'रामनगरी' करण्याच्या प्रस्तावास उद्धव ठाकरे यांचा नकार
* औरंगाबाद जिल्ह्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी माजी सैनिकांचे सशस्‍त्र पथक तयार करणार- जिल्हाधिकारी
* मुंबईत सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू
* राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन
* मुंबई बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी पोहोचली ४८ ते ५० रुपयांच्या घरात तर बाजरी वाढली २६ ते ३० रुपयांपर्यंत
* मुंबईतील ७४ टक्के हॉटेलांमधील स्वयंपाकघर अन्न शिजवण्याच्या दर्जाची नाहीत- ५०० हॉटेलांच्या पाहणीतून स्पष्ट
* अकरावीच्या 'संस्कृत सारिका' मार्गदर्शकात जिजाऊंचा उल्लेख शिवरायांच्या पत्नी म्हणून, पुस्तक रद्द करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
* शरद पवार यांनी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे या मामाच्या गावाला खासदार निधीतून दिली कोट्यवधीची भेट
* पत्नी आणि आईमधील रोजच्या भांडणाला कंटाळून गोरेगावात मुलाने केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू
* गदिमा प्रतिष्ठानचे गदिमा पुरस्कार सई परांजपे यांच्या हस्ते प्रदान, भारती मंगेशकर, प्रा. मिलिंद जोशी, केतकी माटेगावकर यांचा गौरव
* आज मराठीची दशा केविलवाणी झालीय, 'माय मराठी' नव्हे तर, 'ममी मराठी' म्हणायची वेळ आलीय- ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे
* लढाऊ म्हणून ओळखणारे मराठी लोक नेमके मराठीवरील आक्रमणाच्या प्रश्नावर स्वस्थ का बसून राहतात?- सई परांजपे
* इंग्रजीची झिलाई चढलेली मराठी अजून कधीपर्यंत सहन करायची- सई परांजपे
* मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ १७ डिसेंबर घेणार शपथ
* इंग्रजी साहित्यिक अमिताभ घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
* राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत: अनिल अंबानी
* राफेल प्रकरणी न्यायालयात नाही तर संसदेत तोडगा निघू शकेल, तसेच राम मंदिर तयार करणं हे न्यायालयाचं काम नाही- संजय राऊत
* बाटा कंपनीच्या वारली चित्र असलेल्या चप्पल बाजारात, आदिवासी समाजाकडून निषेध
* ११-१२ जानेवारी रोजी भाजप राष्ट्रीय परिषदेची दिल्लीत बैठक
* मोबाईल पोर्टेबिलिटीचा आठवड्याचा कालावधी झाला कमी, एकाच सर्कलच्या नंबरसाठी ०२ दिवस तर, अन्य सर्कलसाठी लागणार ०४ दिवस
* अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मानतात भारताला खरा मित्र
* सरकारी बँकांनी गेल्या चार वर्षांत केली ०२. ३३ लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जांची वसुली- सरकारची संसदेत माहिती
* बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप विवाहबध्द


Comments

Top