HOME   महत्वाच्या घडामोडी

कोस्टल रोडचं भूमीपूजन, वसई किल्ल्याचे दुरुस्ती अभियान, चॅनेल महागणार, भाजपच्या ७० पत्रपरिषदा, अयोध्येत १७० धोकादायक मंदिरे......१६ डिसेंबर २०१८

कोस्टल रोडचं भूमीपूजन, वसई किल्ल्याचे दुरुस्ती अभियान, चॅनेल महागणार, भाजपच्या ७० पत्रपरिषदा, अयोध्येत १७० धोकादायक मंदिरे......१६ डिसेंबर २०१८

* आज सकाळी दहा आजता म्हाडांच्या घरांसाठी मुंबईत सोडत
* कोस्टल रोडचं आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ, मच्छीमारांचा विरोध. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही
* राफेल प्रकरणी रिलायन्स कार्यालयासमोर पोस्टरबाजी
* मिझोरामथंग यांची मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदी निवड
* छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजून कायम, चौघांची नावे पुढे
* पकिस्तानानच्या दूतावासातून २३ शीख भारतीयांचे पासपोर्ट गायब
* हातकणंगलेच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता मानेशिवसेनेत दाखल, ठाकरे यांनी बांधले शिवबंधन
* महाराष्ट्रातला साखर उद्योग अडचणीत केंद्राने मदत करावी- शरद पवार
* वसई किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी राज्यभरातून हजारो तरुण येणार
* नंदूरबारमध्ये चेतक उत्सवाला सुरुवात ९२०० अश्व दाखल
* चॅनल पाहणे महागणार, मासिक खर्च किमान ७०० रुपये लागणार
* केबल, डीटीएच, आयपी टीव्ही, हिट्स कंपन्यांसाठी एकच दर निश्चित
* एफआरपीची रक्कम थकववणार्‍या पश्चिम महाराष्ट्रातील १४ साखर कारखान्यांना निटिसा
* साखरेचा एफआरपी २९ ऐवजी ३१ रुपये करण्याची केंद्राकडे मागणी- देवेंद्र फडणवीस
* शिवसेना करणार २४ डिसेंबरला पंढरपुरात शक्तिप्रदर्शन, उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या तीरावर करणार आरती
* पाच राज्याच्या निवडणूक निकालावरून लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील असे वाटत नाही
* पाच राज्यांच्या निकालामुळे आकाशात उडणारे जमिनीवर आले- ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे
* पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या घरवापसी उपक्रमाची सुरूवात सोमवारी कर्जतपासून
* हर हर मोदी, घर घर मोदी नारा देणाऱ्या मोदी सरकारला आता शेवटची घरघर, सरकारला उलथवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे
* अहमदनगर महापौर निवडण्याची जबाबदारी शिवसेनेने टाकली रामदास कदम यांच्यावर
* अतिप्रदूषित माहुलमधून सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी माहुलवासियांनी काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले मेधा पाटकर यांनी
* पुणे येथे फ्लॅटमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा, १५ जणांवर गुन्हा
सवाई गंधर्व महोत्सवास शरद पवार यांची हजेरी
* पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे १९ ते २६ डिसेंबर दरम्यान दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
* बंगालच्या खाडीत होणाऱ्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारी दुपारी आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये धडकणार 'पेथाई' वादळ
* राफेलप्रकरणी भाजपच्या सोमवारी ७० ठिकाणी पत्रकार परिषदा
* अयोध्या शहरातील १७० धोकादायक मंदिरे, धर्मशाळांसह इमारती पाडण्याच्या महापालिकेच्या नोटीसा
* मध्य प्रदेश विधानसभेतील २३० आमदारांपैकी ९४ जणांवर विविध गुन्हे, ४७ जणांवर गंभीर गुन्ह्यांचा ठपका
* राफेल करार निकालातील कॅग आणि पीएसी परिच्छेदातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारची याचिका
* राफेल विमान खरेदी प्रकरणी कॅगच्या अहवालाबाबत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली- शरद पवार
* ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा- ख्रिस्तियन मायकेलच्या सीबीआय कोठडीत चार दिवसांची वाढ
* जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत ०७ नागरिकांचा मृत्यू, ०३ दहशतवाद्यांचा खातमा
* सरबजीतच्या हत्या प्रकरणी दोन आरोपींची लाहोर कोर्टाने केली सुटका
* छोटा शकीलचा भाऊ अनवरला अबुधाबीत अटक
* जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरमध्ये घातक अॅस्बेस्टॉस असल्याचे रॉयटर्सचे वृत्त, वृत्त एकतर्फी आणि चुकीचे असल्याचा कंपनीचा दावा


Comments

Top