HOME   महत्वाच्या घडामोडी

राहुलनी पप्पा बनावं, वाघांचे स्थलंतर, सितारामन आज मुंबईत, मला मुख्यमंत्री म्हणू नका.......१७ डिसेंबर २०१८

राहुलनी पप्पा बनावं, वाघांचे स्थलंतर, सितारामन आज मुंबईत, मला मुख्यमंत्री म्हणू नका.......१७ डिसेंबर २०१८

* किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
* राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मगणी
* लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी
* जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक
* लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर
* मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
* राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा
* राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश
* शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ
* भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी
* खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान
* देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी
* कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद
* गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार
* यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक
* नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य
* पंतप्रधानपधान पदासाठी द्रमुकचा राहूल यांना पाठिंबा, स्टॅलिन यांची घोषणा
* चंद्रपुरात माणूस आणि वाघातील संघर्ष टाळ्ण्यासाठी वाघांचे स्थलांतर
* मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणू नका- अजित पवार
* मीच खरा गोपिनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसदार- धनंजय मुंडे
* बीड जिल्हा परिषदेत सापत्न वागणूक मिळत असल्यानं पाठिंबा काढून घेणार- विनायक मेटे
* पेथाई वादळ आज आंध्रच्या किनारपट्टीवर
* राहूल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, त्यांनी पप्पा बनावं, लग्न करावं- रामदास आठवले
* मुंबईत कोस्टल रोडचे भूमिपूजन केले उद्धव ठाकरे यांनी, कार्यक्रमाला भाजप नेत्यांची अनुपस्थिती, निमंत्रणच नाही
* संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आज मुंबई दौऱ्यावर
* कोस्टल रोडमुळे मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येईल असे कोळी बांधवांना वाटते त्याचा महापालिकेने विचार करावा-मनसे
* कोस्टल मार्गाबाबत प्रशासनाने आठमुडेपणा केला तर संघर्ष करावा लागेल- राज ठाकरे
* बाबासाहेबांनी ‘मनुस्मृती’ जाळली ती देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी, समाजात उत्कृष्ट काम करण्यासाठी सत्ता महत्त्वाची- छगन भुजबळ
* राज ठाकरे मंगळवारपासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
* नागरी व सहकारी बँकांनी आधुनिकतेची कास धरावी, सहकारी बँकांनी आरबीआयच्या नियंत्रणाविरोधात उठाव करावा- राज्य सहकारी बँक अध्यक्ष
* राफेल खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देणाऱ्याचे नाव पुढे आले पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
* राज्यात ०१ लाखाहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ६१ लाख लाभार्थ्यांपैकी ०८ लाख लाभार्थी बनावट
* चेन्नईत डीएमके नेते एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे सोनिया गांधी यांनी केले अनावरण
* राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला ममता बॅनर्जी यांचा विरोध
* राफेलप्रकरणी संसदेत चर्चा झाली पाहिजे- राम माधव
* राजकारणातील शॉर्टकट प्रगतीकडे नाही, तर अधोगतीकडे नेतो- अमित शहा
* मजबूत आणि एकजूट काँग्रेस पक्षाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध - राहुल गांधी
* काँग्रेसने दहा वर्षाच्या सत्ताकाळात स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी का केली नाही?- पंतप्रधान
* पंतप्रधानांच्या हस्ते रायबरेलीत २३ हजार घरांचे वाटप, २०२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा प्रयत्न- पंतप्रधान
* पूर्वीच्या सरकारांनी रायबरेलीचा विकास होऊ दिला नाही- नरेंद्र मोदी
* राफेल डीलमध्ये क्वात्रोची मामा, मिशेल काकाचा सहभाग नसल्यानेच काँग्रेसचा तीळपापड- नरेंद्र मोदी
* कर्नाटकात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ०६ जणांचा मृत्यू, ०५ जण जखमी
* उत्तर प्रदेशात २०१९ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वेच्या ८०० विशेष गाड्या
* नोकऱ्या आणि रोजगारावरून ४७ टक्के लोकांना चिंता, ५२ टक्के लोकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारणा होण्याचा विश्वास- आरबीआय अहवाल
* जर्मनीत चॉकलेटच्या टँकरला गळती, ०१ टन चॉकलेट रस्त्यावर, रस्ता झाला चॉकलेटमय


Comments

Top