HOME   महत्वाच्या घडामोडी

भारतात असुरक्षित वाटते- नसीरुद्दीन, हनुमान मुसलमान? चार दिवस बॅंका बंद, मेटेंनी केले शिवस्मारकाचे पूजन, ओबीसी आरक्षणाला आव्हान, पहिली चारा छावणी......२१ डिसेंबर २०१८

भारतात असुरक्षित वाटते- नसीरुद्दीन, हनुमान मुसलमान? चार दिवस बॅंका बंद, मेटेंनी केले शिवस्मारकाचे पूजन, ओबीसी आरक्षणाला आव्हान, पहिली चारा छावणी......२१ डिसेंबर २०१८

* मुंबईतल्या म्हाडाच्या घरांच्या किमती ०५ टक्क्यांने कमी
* ओबीसींना दिलेलं आरक्षण गरजेपेक्षा जास्त बाळासाहेब सराटे यांची याचिका, ०९ जानेवारीला सुनावणी
* पुढील चार दिवसांसाठी बॅंका बंद
* सोहराबुद्दीन चमकम प्रकरणी आज सीआय कोर्ट देणार निर्णय
* विनायक मेटे यांनी गुपचूप आटोपले शिवस्मारकाचे भूमीपूजन
* महाआघाडीत यायचे असेल तर एमआयएची साथ सोडावी- कॉ\स-राष्ट्रवादी
* हनुमान मुस्लीम होते, म्हणूनच रेहमान, सुलेमान अशी नावे ठेवली जातात, उत्तरप्रदेशातील भाजप आमदार बुक्कल नवाब
* मुलांना भारतात ठेवणे असुरक्षित वाटते- नसीरुद्दीन शाह
* भारतीय बनावटीच्या ट्रेन १८ वर दगडफेक
* शिवरायांच्या समुद्रातील स्मारकारवरही जीएसटीचा बोजा
* अहमदनगरात पहिली चारा छावणी स्रुरु,‘स्वाभिमानी’ चारा छावणीत ९० जनावरे
* कांदा उत्पादकांना अतिशय अल्प अनुदान, वाढवा अन्यथा नाशिकमध्ये आंदोलन- धनंजय मुंडे
* औरंगाबाद सिटी बससेवा आणि एसटीपीचे रविवारी उद्घाटन करणार आदित्य ठाकरे, रस्ते, गॅस निर्मिती प्रकल्प शुभारंभ होणार मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते
* आदित्य ठाकरे यांची आधी वेळ घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी आमदार बैठकीचे निमित्त सांगून रविवारी कार्यक्रमाला येण्यास दिला नकार
* मुंबईत डॉ. होमी जहांगिर भाभा क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
* शिक्षणाची काळानुरूप दिशा ठरविण्यासाठी शिक्षणाचा विकास आराखडा बनणार- विनोद तावडे, महाराष्ट्र टाइम्सच्या मुख्याध्यापक परिषदेत
* दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन १५ ते १९ जानेवारीला मुंबईत होणारी राष्ट्रकुल परिषद रद्द करा- राधाकृष्ण विखे पाटील
* लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या- राजू शेट्टी
* मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जागेसाठी वसई-विरार महापालिकेचा विरोध
* जो मंत्री दिसेल त्याला बेशुद्ध पडेपर्यंत कांदा फेकून मारा, कांदा नाकाला लावून शुद्धीवर आणा, पुन्हा कांद्याने मारा- राज ठाकरे
* कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
* मंत्र्यांना कांदा फेकून मारा, या आपल्या वक्तव्याने सरकार जागं झालं- राज ठाकरे
* पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाजवळही भूकंपाचे सौम्य धक्के
* वरळी दूरदर्शन इमारतीत आग, आगीमुळे एफएम चॅनलचं प्रसारण बंद
* आयआयटी रुरकीतील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दोन प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल
* अलिबागमधील बेकायदेशीर बंगल्यांच्या तोडकामाची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुरेसा निधी नाही
* बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या भाडे कराराचं मुद्रांक शुल्क माफ
* मुंबईतील जिना हाऊसचे रुपांतर आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रामध्ये करण्यास केंद्र सरकारची मंजूरी
* जिना हाऊसवर हक्क सांगणाऱ्या पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला भारताने, ही संपत्ती भारताच्याच मालकीची
* शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना काँग्रेससोबतची युती तोडावी लागेल- प्रकाश आंबेडकर
* ज्येष्ठ संशोधिका, वैज्ञानिक चळवळीतील कार्यकर्त्या लेखिका चित्रा बेडेकर यांचे निधन
* जयंत नारळीकर यांना यंदाचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी ज्योतीराव फुले पुरस्कार जाहीर
* कृष्णात खोत, मधुकर धर्मापुरीकर, इरावती कर्णिक, रामदास भटकळ, मृदुला बेळे, सतीश भावसारांसह ३२ लेखकांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
* नगर जिल्ह्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या प्लास्टिकच्या घनकचऱ्यापासून बांधकामासाठी विटा
* अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या आगीप्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्या- सीटू संघटना
* विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नितिन आणि चेतन संदेसरा, ललित मोदींसह ५८ पळपुट्यांना परत आणण्याचा प्रयत्न करणार- केंद्र सरकार
* पीएनबी घोटाळा: सीबीआयने केली बँक अधिकाऱ्यांसोबत दहा जणांना अटक
* पश्चिम बंगालमध्ये काढण्यात येणाऱ्या भाजपच्या 'गणतंत्र बचाओ यात्रे'ला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी, रथयात्रा २२ डिसेंबरपासून
* अयोध्येत वादग्रस्त जागेवर नमाज पठणाची परवानगी मागणार्‍या अल-रेहमान या संघटनेला ०५ लाखाचा दंड
* आज उत्तररात्री ०३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश, रात्र असणार सर्वात मोठी, १३ तास ०३ मिनिटांची
* नोटाबंदीचा काय फायदा झाला याची माहिती देशाला द्या- रामविलासपुत्र चिराग पास्वान


Comments

Top