HOME   महत्वाच्या घडामोडी

ठाकरेघरी शुभमंगल, २५०० किलोचं भरीत, कन्हैय्याकुमारला परवानगी नाकारली, भारतरत्न परत घ्या, मराठे-ओबीसीत भांडण, गद्दार का म्हणता?......२२ डिसेंबर २००१८

ठाकरेघरी शुभमंगल, २५०० किलोचं भरीत, कन्हैय्याकुमारला परवानगी नाकारली, भारतरत्न परत घ्या, मराठे-ओबीसीत भांडण, गद्दार का म्हणता?......२२ डिसेंबर २००१८

* एकुर्गा येथे ४० एकर ऊस जळून खाक, भाजपा कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टळला
* आरमान कोहलीला बेड्या, त्याच्या घरात सापडल्या ४१ विदेशी दारुच्या बाटल्या
* मुंबईच्या बेस्टचे कर्मचारी ६० डिसेंबरपासून पुन्हा संपावर
* जीएसटी समितीची आज ३१ वी बैठक
* अनेक वस्तूंचे भाव होणार कमी, इंधनही कमी होण्याची शक्यता
* राम मंदिरासाठी वाराणसी या मोदींच्या मतदारसंघातून शिवसेनेचे अभियान
* राष्ट्रवादीने पुणे लोकसभा मतदारसंघाचा हट्ट सोडला
* कॉंग्रेस आघाडी मित्रपक्षांना तीन जागा सोडणार
* राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित याचे २७ जानेवारीला शुभमंगल
* कन्हैय्याकुमारच्या मुंबईच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
* फोन कॉल आणि डेटा सर्फिंगवर सरकार लक्ष ठेवणार
* ऑगस्टा आणि मिशेल प्रकरणावर आज सुनावणी
* राजीव गांधी यांचा भारतरत्न परत घ्यावा, आपच्या अलका लांबा
* नागपुरात एका वकिलावर ज्युनिअरचा कुर्‍हाडीने हल्ला, मग केली आत्महत्या
* सुपरस्टार रजनीकांत काढणार टीव्ही चॅनेल
* यंदाची हिंद केसरी स्पर्धा पुण्यात
* दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे हॉलतिकिट या वर्षापासून झाले ऑनलाइन
* आरक्षणातील वाट्यासह स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मराठ्यांना दिल्याने ओबीसी अस्वस्थ, सरकारने मराठे व ओबीसींमध्ये भांडणे लावली- प्रकाश आंबेडकर
* भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी ०१ जानेवारीला जाणार, कोणी रोखू शकत नाही- प्रकाश आंबेडकर
* निवडणुकीपूर्वी झालेल्या करारानुसार भाजपने ताटकळत ठेवले, अन्याय झाला, भाजपसोबत युती नको- रिपाई आठवले गट
* बनावट नोटांप्रकरणी औरंगाबादमध्ये दोघे अटकेत
* कृउबाचे अनेक भूखंड समितीचे अध्यक्ष आणि सहकार्‍यांनी हडप केले, हरिभाऊ बागडेंचे ते कार्यकर्ते- व्यापार्‍यांच्या तक्रारी, चंद्रकांत खैरे
* वाहतूक कोंडीमुळे पंकजा मुंडे पुण्यात कार्यक्रमाला पोहचल्या उशिरा
* खड्ड्यांमुळे पोहचण्यास उशीर झाला तर नागरिकांना त्रास होतो मात्र विकासकामांमुळे उशीर झाला तर आनंद होतो- पंकजा मुंडे
* पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामात स्थानिक भूमिपुत्रांनाच रोजगार द्या- मनसे
* पाथर्डीत मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना चोपले नागरिकांनी
* नागपूर जिल्हा न्यायालयाजवळ वकीलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, हल्लेखोराची आत्महत्या, वकिलाचा मृत्यू
* साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर लेखकच नसतात, मंत्री- नेत्यांच्या गर्दीत अध्यक्ष शोभेचा फ्लॉवरपॉट असतो- नाटककार महेश एलकुंचवार
* जळगावात खानदेशी भरीताचा विश्वविक्रम, विष्णु मनोहरांनी केले २५०० किलोचे भरीत
* पुण्यातील युवा शास्त्रज्ञांचा फेलोशिप वाढीसह विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा
* हनुमान जाट होते- उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी
* वितरकांचे कमिशन आणि सर्व कर वगळले तर दिल्लीत पेट्रोल ३४.०४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ३८.६७ रुपये प्रती लिटर होईल- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
* जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केल्यास मधुमेह नियंत्रितच नव्हे, तर पूर्णतः बरा करता येतो-डॉ. जगन्नाथ दीक्षित
* मी जे बोललो, ते भारतीय नागरिक म्हणून मला वाटणारी चिंता होती, त्यात असं काय होतं की, ज्यामुळे मला गद्दार म्हटलं जात आहे?- नसीरुद्दीन शहा
* कॉम्प्युटरच्या प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची असणार नजर, देशातील दहा बड्या एजन्सी ठेवणार कॉम्प्युटरवर वॉच
* कॉम्प्युटर डेटावर पाळत ठेवण्याचे आदेश २००९ मध्ये देण्यात आला होता- अरुण जेटली
* कॉम्प्युटर डेटावर पाळत ठेवण्याच्या आदेशावरून काँग्रेसची केंद्रावर टिका, शिवसेनेचाही हल्ला
* तुम्ही मोबाईल-कॉम्प्युटरमध्ये घुसताय, याचा अर्थ तुम्ही ईव्हीएममध्ये घुसले आहात- खा. संजय राऊत
* कॉम्प्युटर पाळतीसंदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करा- ममता बॅनर्जी
* वैष्णव देवी मंदिर आणि भैरव मंदिर दरम्यान सुरु होणार रोप वे सेवा
* खतं-बियाणांसाठी शेतकऱ्यांना दर वषी ०५ हजार देणार- झारखंड सरकार
* अल्पवयीन बलात्कार खटलाः आरजेडी नेता राज वल्लभ यादवला जन्मठेप आणि ५० हजारांचा दंड


Comments

Top