HOME   महत्वाच्या घडामोडी

बाला रफीक महाराष्ट्र केसरी, वाळू माफियांच्या हल्ल्यात तीन जखमी, नव्या साखर कारखान्यांना परवानगी नको, बॅंकांच्या विलीनीकरणाविरोधात संप, भारत खरा सहिष्णू......२४ डिसेंबर २०१८

बाला रफीक महाराष्ट्र केसरी, वाळू माफियांच्या हल्ल्यात तीन जखमी, नव्या साखर कारखान्यांना परवानगी नको, बॅंकांच्या विलीनीकरणाविरोधात संप, भारत खरा सहिष्णू......२४ डिसेंबर २०१८

* शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज पंढरपूरच्या दौर्‍यावर; महा आरती, सभेचे आयोजन
* मराठा आराक्षणाचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल खा, उदयनराजे यांनी केले कौतुक
* डीवाय पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
* बाला रफीक ठरला महाराष्ट्र केसरी
* धनगर आरक्षणासाठी एकही बारामतीचा नेता आला नाही- मुख्यमंत्री
* सीबीएसईची दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ०३ एप्रिल दरम्यान
* मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री
* नागपुरात झाली कन्हैय्याकुमारची सभा
* औरंगाबादेत रेती माफियांनी केलेल्या हल्ल्यात तीन महसूल कर्मचारी जखमी
* इंडोनेशियातील त्सुनामीत २२२ जणांचा मृत्यू
* नांदेडच्या मराठवाडा पाणी परिषदेला मराठवाड्यातील केवळ तीन आमदारांची हजेरी
* मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा, मराठवाडा साहित्य परिषदेत मागणी
* गोंदियात कॅंसर रुग्णालयाचे शरद पवार यांनी केले उद्घाटन
* यापुढे साखर कारखान्यांना परवानगी देऊ नका, इथेनॉल कारखान्याला द्या- नितीन गडकरी
* केंद्रीय दुष्काळ पथकाला विदर्भात न जाण्याच्या सरकारच्या सूचना- शरद पवार
* विजया, देना आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरण विरोधात सार्वजनिक आणि खाजगी बँकांचा बुधवारी लाक्षणिक संप
* औरंगाबादेत स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा व सिवरेज ट्रिटमेंट प्लांटचे आदित्य ठाकरेंनी केले लोकार्पण
* सरकारच्या विरोधात बोलणारे राष्ट्रविरोधी कसे? राष्ट्रवादाचं प्रमाणपत्र देणारे आपण कोण?- आदित्य ठाकरे
* एकवेळ हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत, पण भाजपने सिंचन योजना पूर्ण करून दाखवली- नितीन गडकरी
* महाआघाडीनंतर ज्या राज्यांत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे, त्याला अधिक जागा- शरद पवार
* जो पक्ष ज्या राज्यात मजबूत त्याने मोठय़ा भावाची भूमिका वठवावी, इतरांनी त्याला सहकार्य करावे, नाही तर आघाडी टिकणार नाही- शरद पवार
* भाजपनं बंद पाडलेला भंडारा जिल्ह्यातील प्रस्तावित 'भेल' प्रकल्प सत्ता आल्यावर पूर्ण करू- शरद पवार
* राज्य सरकारने इतिहास बदलला, इतिहास बालभारतीत नव्हे तर रामभाऊ म्हाळगीत लिहिला जातो- कपिल पाटील
* सदसदविवेक बुद्धीवरच लोकशाही टिकून, द्वेषाचा विषाणू पसरवत सामान्य माणसाला जीवानिशी मारले जात आहे, सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणसे हे ठरवावे लागेल- फादर फ्रान्सिस दिब्रिटो
* महाराष्ट्राच्या वेदांगी कुलकर्णीने २९ हजार किलोमीटर अंतर १५४ दिवसांत सायकलवरून केले पूर्ण, जगप्रदक्षिणा घालणारी आशियातील पहिली सायकलपटू
* ब्रह्मपुत्रा नदीवरील सर्वांत लांब बोगीबील पुलाचे मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण
* हरेन पांड्यापासून सोहराबुद्दीनपर्यंत कोणाचीच कोणी हत्या केली नाही, या सगळ्यांनी स्वत:लाच मारून घेतलंय- राहुल गांधी
* एनडीएचे बिहारमधील जागावाटप निश्चित, भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमारांचा जनता दल युनायटेड लढवणार प्रत्येकी १७ जागा
* मुरारी बापूच्या अयोध्येतील राम कथेत मुंबईतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची उपस्थिती, हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध
* ओदिशात ०४ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या 'अग्नी ४' मिसाइलची चाचणी यशस्वी
* जे मंदिर बनवतील, त्यांनाच मते मिळतील- राजनाथ सिंग, लखनऊत राजनाथ सिंगांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, थांबवावे लागले भाषण
* सुरक्षित असून असुरक्षित वाटणं फॅशन झाली आहे- प्रकाश जावडेकर यांचा नसिरुद्दीन शहांना टोला
* जगात भारतासारखा सहिष्णू देश दुसरा कोणताही नाही- गृहमंत्री राजनाथ सिंह
* 'नापाक' आणि वैयक्तिक अस्तित्व राखण्यासाठी केलेली महाआघाडी- नरेंद्र मोदी
* पाकने आधी आपला देश सांभाळावा, देशाशी संबंधित मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करावं- नसिरुद्दीन शहा
* अल्पसंख्याकांना समान वागणूक मिळणार नाही हे जिना बोलायचे, भारतात ते घडत आहे, नसिरुद्दीन शहा तेच बोलले- पाक पंतप्रधान इम्रान खान
* राहुल गांधी वापरत असलेल्या 'लेदर हाफ जॅकेट' ला काँग्रेस कार्यकर्त्यांची पसंती, 'मोदी जॅकेट'ला गांधींकडून उत्तर देण्याचा प्रयत्न- 'फॅशन' तज्ज्ञ


Comments

Top