HOME   महत्वाच्या घडामोडी

बाभळगाव नाक्यावर अपघात एक ठार, १०० रुपयांचे नाणे त्यावर अटलबिहारी, पीक विमा की भीक? उद्धव, युतीचा निर्णय जनतेवर, दल सरोवर गोठले, दाऊदचा हस्तक सापडला......२५ डिसेंबर २०१८

बाभळगाव नाक्यावर अपघात एक ठार, १०० रुपयांचे नाणे त्यावर अटलबिहारी, पीक विमा की भीक? उद्धव, युतीचा निर्णय जनतेवर, दल सरोवर गोठले, दाऊदचा हस्तक सापडला......२५ डिसेंबर २०१८

* बाभळगाव नाक्यावर अपघात एक ठार रिक्षा आणि कंटेनरची धडक, रिक्षाचालक ठार, दोन विद्यार्थी जखमी
* बाभळगाव नाक्यावर रिक्षा आणि कंटेनरची धडक, रिक्षाचालक ठार, दोन विद्यार्थी जखमी
* नुकसान भरपाईचे आश्वासन मिळाल्यानंतर लातुरच्या मुख्य जलवाहिनीचे दुरुस्ती काम सुरु
* चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याने वासनगाव ते गंगापूर जिओच्या केबल टकणीचे काम जिल्हधिकर्‍यांनी रोखले
* मांजरा ठरला मराठवाड्यात सर्वाधिक उतारा देणारा साखर कारखाना
* पंतप्रधानांनी आणले १०० रुपयांचे नाणे समारंभपूर्वक चलनात
* १०० रुपयांच्या नाण्यावर एका बाजुने अटबिहारी वाजपेयी यांचे चित्र
* मुंबईतील ०८ हजार घरे देणार गिरणी कामगारांना, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
* महाराष्ट्रातील सर्व सर्कारी अधिकारी ०५ जानेवारीला जाणार सामुहिक रजेवर
* आधार कार्डाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल
* पीक विम्याच्या नावावर शेतकर्‍यांना भीक देता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
* अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनबाबत नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची एकही बैठक झाली नाही, माहिती आधिकारात उघड
* पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मह्लेने पंतप्रधानांना केली ०५ रुपयांची मनी ऑर्डर
* कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरातील दल सरोवर गोठले
* शेतकर्‍यांसाठी खरेदी केलेली जमीन बबनराव लोणीकरांनी हडपली, जालन्यातील शेतकर्‍यांचा आरोप
* माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज पहिली जयंती
* सरकारने ऊसाला प्रतिटन पाचशे रुपये दिल्यास एफआरपी एकरकमी देणे शक्य- साखर कारखाना संघटना
* शिवसेनेच्या दादागिरीला विरोध केला म्हणून दाखल केलेल्या खटल्यातून निखिल वागळे, हुसेन दलवाई, अबू आजमींची २१ वर्षानंतर निर्दोष मुक्तता
* नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी केली- जयंत पाटील
* काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षासह आगामी लोकसभा निवडणूक लढवणार- शरद पवार
* मला सत्ता नको, जागा वाटपात मला स्वारस्य नाही, राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात- उद्धव ठाकरे
* युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही, युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे- उद्धव ठाकरे
* आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय, त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ- उद्धव ठाकरे
* उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगा १५१ रुपये बक्षीस मिळवा- मनसे
* उद्धव ठाकरे म्हणाले २५ वर्षे युतीत राहून शिवसेना सडली, युती होणार नाही असेही म्हणाले, आता युतीचा निर्णय जनताच घेणार म्हणतात
* भायखळा रेल्वे स्थानकाजवळून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन महिलांना अटक, मुलीची सुखरूप सुटका
* शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री निधीसाठी पन्नास कोटींचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
* यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात ०८ जण ठार, ०७ जण जखमी
* औरंगाबाद येथे ०९ जानेवापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
* २८ वर्षापासून फरार असलेल्या दाऊदचा हस्तक मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* मी देशद्रोही नाही, देशभक्त आहे हे ओरडून आणि गाजावाजा करून सांगण्याची गरज नाही- नसिरुद्दीन शहा
* कलाकारांची गरज प्रत्येक क्षेत्रात असते, त्यांनी काही मत मांडू नयेत अशीही अपेक्षा असते, ते सगळ्यांचेच सॉफ्ट टार्गेट ठरतात- सुनील शेट्टी
* पश्चिम बंगालमध्ये हायकोर्टाने भाजपच्या रथयात्रेला नाकारली परवानगी, भाजपने दिलं सुप्रीम कोर्टात आव्हान
* हुंडा दिला नाही म्हणून सौदीमध्ये राहत असलेल्या पतीनं पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल दिला फोनवरून तलाक
* जीएसटीचे दर आणखी कमी करण्यात येणार, १२ आणि १८ टक्क्यांमध्ये एक नवीन स्टँडर्ड टॅक्स स्लॅब बनवणार- अरुण जेटली
* मीटूः आलोकनाथ यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून
* कर्नाटकात जेडीएस नेता प्रकाश यांची हत्या
* अहमदाबादेत ख्रिसमसनिमित्ताने बनवला ७५० किलोचा केक
* कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदार रमेश जारकिहोलींना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी
* भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ०७ वर्षाचा तुरुंगवास
* पश्चिम बंगालमधील रथयात्रेसंदर्भात तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, भाजप कार्यकर्ते आणि पोलीस भिडले एकमेकांना
* नरेंद्र मोदी यांनी कधीच चहा विकला नव्हता, केवळ मीडियाच्या प्रचारामुळे ते पंतप्रधान बनले- शत्रुघ्न सिन्हा
* हैदराबादमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीस जिवंत जाळले, आईवडिलांना अटक
* राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरनातिल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ०४ जानेवारीपासून सुनावणी


Comments

Top