HOME   महत्वाच्या घडामोडी

फिर एक बार मोदी सरकार, तिहेरी तलाक आज लोकसभेत, नदी पात्रात उपोषण, सलमानचा वढदिवस, शिवसेनेविरुद्ध बोलू नका, नवे साखर कारखाने नकोत, आयटीत ०५ लाख नोकर्‍या.......२७ डिसेंबर २०१८

फिर एक बार मोदी सरकार, तिहेरी तलाक आज लोकसभेत, नदी पात्रात उपोषण, सलमानचा वढदिवस, शिवसेनेविरुद्ध बोलू नका, नवे साखर कारखाने नकोत, आयटीत ०५ लाख नोकर्‍या.......२७ डिसेंबर २०१८

* भाजपचं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'फिर एक बार, मोदी सरकार' असणार घोषवाक्य
* कॉपीराईटनुसार पैसे भरल्याशिवाय नवी गाणी वाजवता येणार नाहीत
* सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याच्या निर्णयाला आज मंजुरी मिळण्याची शक्यता, २३ टक्के वेतनवाढ
* नागपुरात एका वकिलाने विरोधात लागल्याने न्यायाधिशांच्या श्रीमुखात लगावली
* तिहेरी तलाकचे विधेयक आज लोकसभेत निर्णय होण्याची शक्यता, भाजपचा सदस्यांसाठी व्हीप जारी
* पुण्यात रोहित शेंडे या वकिलाला एक कोटी ७० लाखांची लाच घेताना अटक
* गोदावरी नदीत पाणी सोडावे यासाठी जालनेकरांना नदीच्या पात्रातच सुरु केले उपोषण, तेथेच केला मुक्काम
* परभणीत सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर शेतकर्‍यांनी फेकले टोमॅटो
* राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती
* नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत खास लोकल गाड्या सोडणार
* भाजपाचे ०३ जानेवारीपासून पश्चिम बंगालमध्ये कानून तोडो आंदोलन
* इंडोनेशियातील त्सुनामीत आजवर ४२९ जणांचा मृत्यू
* अफगाणिस्तानात कार बॉंबच्या स्फोटात ४२३ ठार
* कांद्याला एक हजार रुपयांचा भाव द्या- आ. बच्चू कडू
* निफाडमध्ये सर्वात कमी तापमान, १.८ सेल्सियसची नोंद
* आज सलमानखानचा वाढदिवस, रात्री १२ वाजता फॅन्सनी केला साजरा
* आमदार व्हायचं असेल तेव्हा कपिल पाटील आमच्या पायाशी लोटांगण घेतात- नवाब मलिक
* राज्यात नवे साखर कारखाने नकोत, इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य द्या, पाणी आहे म्हणून ऊस लावत बसू नका, पीक पद्धतीत बदल करा- नितीन गडकरी
* उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ- देवेंद्र फडणवीस, पंढरपुरात युती गेली खड्ड्यात आधी कांद्याचं बघा असं म्हणाले होते ठाकरे
* कोरेगाव भीमा येथील 'विजय स्तंभ' जागेचा ताबा राज्य सरकारकडे देण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश, ताबा असणार १२ जानेवारीपर्यंत
* बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ट्रेलरमध्ये दिसली उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे यांचीही व्यक्तिरेखा
* भ्रष्टाचार थांबविण्याचं काम फक्त भाषणाने होणार नाही तर भाषणाला कृतीची जोड असणंही महत्त्वाचं- अण्णा हजारे
* स्वतंत्र नेतृत्व निवडण्याचा अधिकार, मी काँग्रेसमध्येच राहिले पाहिजे असे नाही- डॉ. सुजय विखे
* जागावाटपाचा निर्णय होईपर्यंत संयम बाळगा, शिवसेनेविरोधात कुठलंही वक्तव्य न करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचना
* विजयकुमार गावितांचे ४३ लाख आणि एकनाथ खडसेंचे १५ लाख थकित भाडे झाले माफ़- माहिती अधिकार
* महाराष्ट्रात विचारवंत खूप झाले पण त्या सर्वांचे विचार पचवत आपण पुढे आलेलो दिसत नाही- डॉ. अरुणा ढेरे
* मेघालयात १५ कामगार कोळशाच्या खाणीत अडकले असताना नरेंद्र मोदी आसाममध्ये बोगीबिल पुलावर कॅमेऱ्यासाठी पोझ देत होते- राहुल गांधी
* कल्याणमध्ये दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टर आणि मेडिकल दुकानदाराचा लैंगिक अत्याचार
* दिल्ली आणि उत्तर प्रदेशात १० अतिरेकी जेरबंद, अनेक ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवायचे होते- एनआयएचा खुलासा
* भाजपमध्ये मुसलमानांची उपेक्षा, भाजपला सोसावं लागेल २०१९ मध्ये मोठं नुकसान- गुजरातचे व्यापारी जफर सरेशवाला
* समाजवादी पार्टीचा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निर्माण केलेल्या फेडरल फ्रंटला पाठिंबा
* जानेवारीत मोदी सरकार विविध विकास कामे आणि यशस्वी योजनांची आकडेवारी देशवासियांना देणार
* राम मंदिरावरील सुनावणी लांबणीवर पडल्यास पर्यायांचा विचार केला जाईल - राम माधव
* लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे प्रभारी म्हणून प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती
* चॅनल निवडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार, केबल व्यावसायिकांनी पुकारलेलं ब्लॅक आऊट आंदोलन घेतले मागे
* २०१९ मध्ये आयटी आणि स्टार्टअप कंपन्या देणार ०५ लाख तरुणांना नोकऱ्या
* लग्न समारंभात स्त्री-पुरुषांनी एकत्र जेवणं, वरातीत महिलांनी सहभागी होणे इस्लामविरोधी- दारुल उलूम देवबंद * संस्था


Comments

Top