HOME   महत्वाच्या घडामोडी

आता उजनीत वीज प्रकल्प, तिहेरी तलाक राज्यसभेत, इंधन स्वस्त होणार, लोकसभा स्वबळावर- राणे, पंतप्रधानांचे ९२ परदेश दौरे, २०१९ मध्ये ७३ सुट्या......३१ डिसेंबर २०१८

आता उजनीत वीज प्रकल्प, तिहेरी तलाक राज्यसभेत, इंधन स्वस्त होणार, लोकसभा स्वबळावर- राणे, पंतप्रधानांचे ९२ परदेश दौरे, २०१९ मध्ये ७३ सुट्या......३१ डिसेंबर २०१८

* तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार, भाजपाने बजावला व्हीप
* तिहेरी तलाकला कॉंग्रेसचा विरोध कायम
* २०१९ मध्ये रविवारसह तबल ७३ सुट्या
* नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
* पक्षादेश धुडकावणार्‍यांवर पाच दिवसात कारवाई: नगर प्रकरणी
* एसटी कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची बाल संगोपन रजा मिळणार
* नववर्षानिमित्त आज मुंबईत खास रेल्वे लोकल सोडणार
* कोकण रेलेसाठी १० नवीन स्थानकं उभारणार
* ऑगस्टा हेलीकॉप्टर खरेदी प्रकरणात सोनिया गांधी यांचं नाव: सरकार विरोधकांना अडकावण्याचा प्रयत्न करतेय- शरद पवार
* ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात सोनिया गांधी यांना गोवण्याचे षडयंत्र- शरद पवार
* ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी काँग्रेसवर आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून 'चौकीदार चोर है'चा दुसरा भाग- काँग्रेस
* विरोधकांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणारा पंतप्रधान पाहिला नाही- शरद पवार
* अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर
* उजनी प्रकल्पात होणार १००० मेगावॅट वीज निर्मिती, दहा संच बसवणार
* प्रख्यात बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन
* युती झाल्यास भाजपासोबत जाणार नाही- नारायण राणे
* लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार- नारायण राणे
* पंतप्रधानांनी अंदमान निकोबार बेट समुहातील तीन बेटांचे केले नामकरण
* अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक द्वीपांची नावे झाली नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद आणि स्वराज
* पंतप्रधानांनी ५५ महिन्यात केले ९२ देशांचे दौरे
* मनकर्णिका आणि ठाकरे हे चित्रपट नव्या वर्षात होणार प्रदर्शित
* संजय लिला भन्साळी काढणार नवा चित्रपट ‘करण अर्जून’
* भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर अभिवादन करायलाही परवानगी नाही हे निषेधार्ह- कपिल पाटील
* महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे काय? - आ. कपिल पाटील
* सीटबेल्ट दरवाजातच अडकल्याने शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे नगरमध्ये झाले इमर्जन्सी लँडिंग
* मराठवाड्यातील सर्व रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
* नाशिक जिल्ह्यातील कांदा रेल्वेने वाहतुकीसाठी अतिरिक्त रॅक उपलब्ध करून द्या- पाशा पटेल
* औरंगाबादेत पक्षातून काढून टाकल्यानं मनसेचे अभय मांजरमरकर यांचा आत्महत्येचा प्रयत्न
* कॉम्प्युटरवर पाळत ठेवण्याआधी तपास यंत्रणेला केंद्रीय गृह सचिव किंवा राज्याच्या गृह सचिवांची घ्यावी लागणार परवानगी
* पेट्रोल आणि डिझेल दरात घसरण, आत्तापर्यंत पेट्रोल दरात १३.७९, तर डिझेलच्या दरात १२.०६ रुपयांची घसरण
* मार खाऊ नका, मारा, मर्डर करा- पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादवांचा विद्यार्थ्यांना सल्ला, उत्तर प्रदेश सरकारने मागितले स्पष्टीकरण
* दोन किंवा दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्या जोडप्यांना देणार इन्सेन्टिव- आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
* गुजरातमधील कांडला-भाचाऊ महामार्गावर झालेल्या अपघातात १० जण ठार
* पोर्ट ब्लेयर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने अभिमत विद्यापीठ- नरेंद्र मोदी
* 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' पूर्णपणे खोटा- पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
* बांगलादेशात शेख हसीना चौथ्यांदा होणार पंतप्रधान


Comments

Top