HOME   महत्वाच्या घडामोडी

निवडणुकीच्या कामाला लागा- अमित शाह, २६ खासदारांवर कारवाई, अभिनेत्री मौसमी भाजपात, धनंजय मुंडेंवर आरोपपत्र, शिवसेना झुलवतेय, मोदींनी लोटले साडेतीन लाख कोटी?......०३ जानेवारी २०१९

निवडणुकीच्या कामाला लागा- अमित शाह, २६ खासदारांवर कारवाई, अभिनेत्री मौसमी भाजपात, धनंजय मुंडेंवर आरोपपत्र, शिवसेना झुलवतेय, मोदींनी लोटले साडेतीन लाख कोटी?......०३ जानेवारी २०१९

सहा जानेवारी रोजी भाजपाध्यक्ष अमित शाह लातूर भेटीवर
हिंमत असेल तर राफेलवर समोरासमोर चर्चा करा राहूल गांधींचे मोदींना आव्हान
देना, विजया आणि बडोदा बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय
गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन
महाराष्ट्रातील खासदारांसोबत झाली अमित शाह यांची बैठक
कुणी सोबत येईल की नाही याची चिंता करु नका, निवडणुकीच्या कामाला लागा- अमित शाह
राम मंदिरप्रश्नी कोर्टाच्या निर्णयाची प्रतिक्षा करु शकत नाही, सरकारने अध्यादेश काढावा- विहिंप
पुण्यात हेल्मेट न घालणार्‍या साडेसात हजारजणांना दंड
लोकसभेत गोंधळ घालणार्‍या २६ खासदारांवर कारवाई
अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा भाजपात प्रवेश
आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्यानं १३ वर्षाच्या बालकाची आत्महत्या
नववर्षी बाळांना जन्म देणार्‍या देशात भारत सर्वात पुढे
नागपूर मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याला मंजुरी
आज सावित्रीबाई फ़ुले यांची जयंती, साजरा होतोय बालिका दिन
औरंगाबादमधील १०० कोटीच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आज करणार देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे आज खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते भूमिपूजन
शेतकऱ्याला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी धनंजय मुंडेंसह दोघांवर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल
पदवीधर मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने सदस्यत्वाअभावी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंतांना सोडावे लागणार मंत्रीपद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले, पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले- शिवसेना
२०१९ ची चिंता पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती- शिवसेना
नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता- शिवसेनेची टीका
राज्यातील महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील ८३ हजार कर्मचाऱ्यांचा ०७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय
'इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्ट'मध्ये होत असलेल्या संशोधनाचा विरोध आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संप
आदेश निघूनही ८० वर्षाच्या वृद्धेला पेन्शनपासून वंचित ठेवल्याबद्दल राज्य सरकार आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना २५ हजाराचा दंड
भाजपसाठी मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी नगरसेवकांबाबत आज होणार निर्णय
राज्यातील थंडी ओसरण्याची शक्यता
युतीचा प्रस्ताव देण्यास विलंब करून शिवसेना झुलवत असल्याची भाजपला शंका
पैठण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरली पालकांची शाळा
पुण्याचे शिवाजीनगर एसटी स्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील सरकारी दूध योजनेच्या जागेत होणार स्थलांतरित
राम मंदिराच्या मुद्द्यावरच तुम्ही सत्तेत आलात हे विसरू नका- संजय राऊत
चंद्रकांत पाटील यांनी आमच्या एकत्र लढण्याची चिंता करू नये, त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांची काय अवस्था आहे हे आधी पाहावे- राधाकृष्ण विखे पाटील
वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य जन आंदोलन समितीची विदर्भ निर्माण यात्रा, यात्रेचा समारोप होणार १२ जानेवारीला नागपुरात
महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर- शांता गोखले, 'आनंदवन', प्रवीण बांदेकर, हरी नरके, राजीव नाईक, मतीन भोसले, निशा शिवूरकर यांना पुरस्कार
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन, कवठेकर यांची निवड
राम मंदिरासाठी सरकारकडे वेळ नसला तरी वेळ कधीही बदलू शकते, भय्याजी जोशींसारखीच माझी भूमिका- सरसंघचालक मोहन भागवत
उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी, बसप, रालोद एकत्र आले तर भाजपला १५ जागा जिंकणेही अवघड- दिग्विजय सिंह
राफ़ेल खरेदीत नरेंद्र मोदींनी देशाचे साडेतीन लाख कोटी रुपये लुटले- राहुल गांधी
नरेंद्र मोदींनी त्यांच्या मित्राला ३० हजार कोटींचा फायदा मिळवून दिला, मोदी सत्य लपवू शकत नाहीत- राहुल गांधी
राफेलच्या फायली मनोहर पर्रिकर यांच्या घरात बेडरूममध्ये असल्याचा ऑडिओ टेपद्वारे काँग्रेसचा गौप्यस्फोट
काँग्रेसद्वारे सादर केलेली ऑडिओ टेप बनावट, गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांचे मनोहर पर्रिकर यांना पत्र
राफेल विमानं खरेदी करण्याआधी ७४ बैठका झाल्या- अरुण जेटली
राहुल गांधी खोटारडे, त्यांना देश आणि देशाच्या सुरक्षेचं महत्त्व कधीच कळणार नाही, त्यांना फक्त पैशाची भाषा समजते- अरुण जेटली
राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निर्णयाचा फेरविचार करावा- यशवंत सिन्हा, अरुण शौरी, प्रशांत भूषण यांची याचिका
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला रिझर्व बँकेची नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी
नोटाबंदीचा निर्णय प्रत्यक्ष करांसाठी फायदेशीर ठरल्याचा अर्थ मंत्रालयाचा अहवाल, वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ
सचिवालयात 'वंदे मातरम' म्हणण्यास मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांची बंदी, अधिवेशनात पहिल्या दिवशी 'वंदे मातरम' म्हणणार- शिवराजसिंह चौहान
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हीड कोलमन हेडलीच्या शरणागतीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू
श्रीराम आणि हनुमान दोघेही वैश्य समाजाचे, 'हनुमानाला श्रीरामाचा दत्तक पुत्र मानलं जातं याचाच अर्थ रामही वैश्य होते- भाजपचे विनीत अग्रवाल
फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर
सीमेवरील भारतीय ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा, भारतीय लष्कराने फेटाळला दावा


Comments

Top