HOME   महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड, मंदिर-मशीद प्रकरणी आज सुनावणी, राष्ट्रवादीची आज बैठक, आम आदमी स्वबळावर, मॅगीवर पुन्हा बंदीची शक्यता......०४ जानेवारी २०१९

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड, मंदिर-मशीद प्रकरणी आज सुनावणी, राष्ट्रवादीची आज बैठक, आम आदमी स्वबळावर, मॅगीवर पुन्हा बंदीची शक्यता......०४ जानेवारी २०१९

* राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी दाखल १४ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* राफेल प्रश्नी आज पंतप्रधान संसदेत बोलण्याची शक्यता
* राज्यातील दुष्काळग्रस्त गावांचा पुन्हा आढावा, ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर
* लवकरच मुंबईत दाखल होणार १२ एसी लोकल
* युतीसाठी मागचाच जागा वाटपाचा पॅटर्न राबवावा- भाजपा
* काही गमावून युती होणार नाही- अमित शाह
* येत्या लोकसभेत भाजपाला पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळतील- मुख्यमंत्री
* मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील सभेत एमजीएम विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
* सर्वोच्च न्यायालयामुळे राम मंदिराबाबत उशीर होतोय- महंत धर्मदास
* आम आदमी पार्टी आघाडीत सहभागी होणार नाही, स्वबळावर लढ्णार
* एसटी मालवाहतूक सुरु करणार, त्यासाठी गोदामेही बांधणार
* दिल्लीत कॉंप्रेसरचा स्फोट, छत कोसळले, सातजणांचा मृत्यू
* चेंबूरमध्ये संजय अग्रवालने केली स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
* मॅगीत आढळलं शिसं, पुन्हा बंदीची शक्यता
* राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक
* स्वबळावर लढण्यास तयार राहण्याच्या राज्यातील खासदारांना अमित शाह यांच्या सूचना
* रावसाहेब दानवे आज नगरमध्ये, महापालिका निवडणुकीतील ३०० कोटीचे आश्वासन पूर्ण करा, अन्यथा दानवेंची गाडी अडवू- प्रहार जनशक्ती पक्ष
* वेस्टलँड घोटाळा समोर येत असल्याने काँग्रेसने राफेलच्या माध्यमातून अपप्रचार करत कव्हर फायरिंग केले- देवेंद्र फडणवीस
* वेस्टलँडचे दलाल पुन्हा सत्तेत आले, तर संरक्षण विभागाचा सौदा करतील- मुख्यमंत्री
* स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपाने लोकांचा विश्वासघात केला, आगामी निवडणुकीत जनताच भाजपाला धडा शिकवेल- अ‍ॅड. श्रीहरी अणे
* निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी पर्याय म्हणून समोर येईल आणि विदर्भात भाजपाचा सफाया करणार- अ‍ॅड. श्रीहरी अणे
* राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका, पुण्यात मनसैनिकांनी तरुणाला काढायला लावल्या उठाबशा
* रुग्णालयात दाखल झालेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तीची गरज असेल तरच दाढी काढा- समाजवादीने सांगितले मुंबई महापालिकेला
* वीज मंडळाच्या नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकांची पावणेचार लाखांना फसवणूक, नागपुरात एकाला अटक
* नाटककार महेश एलकुंचवार यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
* सातारा दौरा दरम्यान मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचे उघड
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि मणिपूरच्या दौऱ्यावर
* 'जय जवान, जय किसान सारखे जय विज्ञान जय अनुसंधान असा नारा द्या- नरेंद्र मोदी यांचे संशोधकांना आवाहन
* शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेश प्रकरणी एनआयए चौकशी करा- भाजप खासदार
* शबरीमलात दोन महिलांचा प्रवेश, हिंदुत्ववादी संघटनांच्या 'बंद'ला केरळमध्ये हिंसक वळण, पत्रकारांवरही झाले हल्ले
* भाजप आणि शबरीमला कर्म समितीवर बहिष्कार टाकण्याचा पत्रकार संघटनेचा निर्णय
* महिला प्रवेशाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुख्य पुजाऱ्यांना स्वीकारायचा नव्हता, तर त्यांनी पद सोडावे- केरळचे मुख्यमंत्री विजयन
* महिलांच्या प्रवेशानंतर शबरीमला मंदिराच्या शुद्धिकरणासाठी मंदिर तासभर बंद केल्याने विजयन यांनी व्यक्त केली नाराजी
* काँग्रेसने देशाला 'गरीबी हटाओ' चा नारा देत फसवलं, आता कर्जमाफीच्या नावाने फसवतेय- नरेंद्र मोदी
* पश्चिम दिल्लीत पंख्याच्या कारखान्यात स्फोट, ०६ जण मृत्यूमुखी तर १२ जण जखमी
* पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याने ०१.३ अब्ज डॉलरची मदत थांबविणार- डोनाल्ड ट्रम्प


Comments

Top