HOME   महत्वाच्या घडामोडी

१० टक्के आरक्षण चुनावी जुमला, अंगणवाडी सेविका देशव्यापी अंपावर, भाजपात रस नाही- संजय राऊत, १२ आरोपींचे पलायन, पुणे मनपात वाजपेयी यांचे तैलचित्र......०८ जानेवारी २०१९

१० टक्के आरक्षण चुनावी जुमला, अंगणवाडी सेविका देशव्यापी अंपावर, भाजपात रस नाही- संजय राऊत, १२ आरोपींचे पलायन, पुणे मनपात वाजपेयी यांचे तैलचित्र......०८ जानेवारी २०१९

* आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण, विधेयक आज संसदेत मांडणार
* भाजप आणि काँग्रेसचे आपापल्या खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप
* १० टक्के आरक्षण सरकारचा चुनावी जुमला- छगन भुजबळ
* बॅक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर
* मुंबईत बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर, मेस्मा लावण्याचा सरकारचा इशारा
* संसदेचं अधिवेशन एक दिवसानं वाढवलं
* शिवसेनेची वाहतूक सेना कार्यकारिणी रद्द, नवी कार्यकारिणी निवडणार
* बारावीच्या विद्यार्थ्यांची आज जेईई परिक्षा ९.५ लाख विद्यार्त्यांची परिक्षा
* मंत्र्यांना तुडवा, त्यांच्या बायकाही खूष होतील- रविकांत तुपकर
* अंगणवाडी सेविकांचा आज देशव्यापी संप
* रोड रोमिओसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात रस नाही- संजय राऊत
* नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- नितीशकुमार
* अंबानीच्या कंपनीला ३० हजार कोटी रुपये का दिले? राहूल गांधी यांचा सवाल
* कोल्हापुरच्या बालसुधारगृहातून १२ आरोपींचे पलायन, एका आरोपीवर १२ गंभीर गुन्हे
* सोलापुरात होणार्‍या पंतप्रधांनांच्या सभेवर धनगर समाज टाकणार बहिष्कार
* वाहतूक कर्मचारीही आजपासून दोन दिवसांच्या संपावर
* वर्षभरात शिवशाही बसला २५० अपघात
* शिवशाही बसच्या चालक-वाहकांना योग्य प्रशिक्षण न मिळाल्याचा आरोप
* आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर खात्याचा कार्यभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर
* राज्यात दिव्यांग, कलाकार आणि खेळाडूंसाठी ओपन एसएससी बोर्ड - विनोद तावडे
* पुण्याच्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्रिपदी महिला असावी यांसह इतर मागण्यांसाठी त्याचे हे कृत्य
* नयनतारा सहगलांचे निमंत्रण रद्द करण्यामध्ये राज्य सरकारला नाहक गोवण्याचा प्रयत्न, यात सरकारची कोणतीही भूमिका नाही- मुख्यमंत्री
* नयनतारा सहगल यांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण रद्द, लेखकांनी केला जाहीर निषेध, त्यांचे भाषण वाचले जावे अशी लेखकांची मागणी
* पुणे पालिका मुख्य इमारतीत लावणार अटबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र
* नरेंद्र मोदी यांच्या चारित्रपटाचं पाहिलं पोस्टर लाँच, मोदींची भूमिका साकारणार विवेक ओबेरॉय
* नसीरुद्दीन शहांना देशद्रोही ठरवणं साफ चुकीचं- शबाना आझमी
* राज्यातील कारागृहातून पॅरोल आणि फर्लो रजेवरील ६३२ कैदी फ़रार
* बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कायमस्वरूपी नजर ठेवा- केंद्रीय गृह खाते
* इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाचा गौरव करत पंडितजींचे लिखाण व भाषणे आवडतात, भविष्यात राहुल गांधींचेही आचारविचार पटतील- नितीन गडकरी
* आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- प्रिया दत्त
* ऑनलाइन औषधविक्रीवर नियम लागू होईपर्यंत बंदी, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट संघटनेचे आज देशभर हल्लाबोल आंदोलन
* सवर्ण वर्गातील आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आज लोकसभेत चर्चा
* घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा ५० टक्के कोटा वाढवणार, सवर्णांना सरकारी नोकरीत १० टक्के आरक्षण
* सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय म्हणजे, निवडणुकीसाठी केलेली 'नौटंकी'- काँग्रेस
* सवर्णांना देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण घटनेला धरून आहे का?- ममता बॅनर्जी
* सवर्ण आरक्षणाचं रामविलास पासवान यांच्याकडून स्वागत, आम आदमी आणि राष्ट्रवादीचा प्रस्तावाला पाठिंबा
* सवर्ण आरक्षण म्हणजे निवडणुकांपूर्वी सरकारकडून दाखवण्यात आलेलं गाजर- हार्दिक पटेल
* आर्थिक निकषांवर आरक्षण देणं चुकीचं- ओवेसी
* राज्य सरकारांनी शेतीचे कर्ज माफ करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीचाही विचार करावा- आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास
* कर्ज माफ केल्याने कर्जसंस्कृतीवर प्रतिकूल परिणाम, कर्जदाराच्या मानसिकतेवरही नकारात्मक परिणाम- शक्तिकांत दास
* कुष्ठरोग घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही असे सांगणारे विधेयक लोकसभेत मंजूर
* दि अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी घालणारी याचिका फेटाळली, जनहित याचिका दाखल करण्याच्या सूचना
* बेकायदा मालमत्ता जमविल्यावरून सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रांसह सहकाऱ्यांविरोधात 'ईडी'ने दाखल केला गुन्हा
* रिलायन्सचे अनिल अंबानी यांना ५५० कोटीच्या थकबाकी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस, ११८ कोटी जमा करण्यास अंबानी तयार
* प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील भाविकांसाठी जिओनं लाँच केला 'कुंभ जिओफोन', कुंभमेळ्याशी संबंधित सर्व माहिती मिळणार फोनद्वारे


Comments

Top