HOME   महत्वाच्या घडामोडी

बेस्ट प्रकरणात रस्त्यावर उतरु-राणे, अलोक वर्मांना पुन्हा हटवलं, तिहेरी तलाकवर पुन्हा अध्यादेश, भाजपचं दिल्लीत महा अधिवेशन, शीला दिक्षित दिल्लीच्या कॉंग्रेसाध्यक्ष.......११ जानेवारी २०१९

बेस्ट प्रकरणात रस्त्यावर उतरु-राणे, अलोक वर्मांना पुन्हा हटवलं, तिहेरी तलाकवर पुन्हा अध्यादेश, भाजपचं दिल्लीत महा अधिवेशन, शीला दिक्षित दिल्लीच्या कॉंग्रेसाध्यक्ष.......११ जानेवारी २०१९

* मुंबईतल्या बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपाचा आज चौथा दिवस, उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी नाकाम
* आजपासून यवतमाळ येथे मराठी सहित्य संमेलन
* आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन
* ४० लाख रुपयांचं उत्पन्न असणार्‍या उद्योग-व्यवसायांना जीएसटीमध्ये सवलत
* बेस्ट कर्मचार्‍यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्यास रस्त्यावर उतरु- नारायण राणे
* सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांना पुन्हा हटवले
* राफेलबद्दल भिती असल्यानेच सीबीआय संचालक अलोक वर्मा यांना पुन्हा हटवलं- राहूल गांधी
* मॉडीफाय केलेल्या वाहनांना पासिंग मिळणार नाही
* १० टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
* तिहेरी तलाकबाबत पुन्हा केंद्राने काढला तिहेरी तलाकवर अध्यादेश
* कनिष्ट प्राध्यापकांचा आजपासून संप
* आजपासून दिल्लीत भाजपाचे दोन दिवसीय महाअधिवेशन
* दिल्लीतल्या महा अधिवेशनाला ४० हजार कार्यकर्ते जमणार
* बुलडाणा जिल्ह्याचं जिजाऊनगर असे नामकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन- विनायक मेटे
* बाळासाहेब असते तर त्यांनी अमित शहाना लाथ घातली असती- भुजबळ
* मिशेल मामा आणि मोदी मामा व्यावसायिक प्रतिस्पर्धी- सुशीलकुमार शिंदे
* कॉंग्रेसची जनसंपर्क यात्रा आज गोंदियात, राष्ट्रवादीची निर्धार यात्रा मावळमध्ये
* सर्व आरपीआय गट एकत्र येणार असतील तर भाजपाची साथ सोडू- रामदास आठवले
* राहुल गांधी यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस, नरेंद्र मोदींवर टीका करताना महिलांचा अपमान केल्याचा आरोप
* बॉलीवूडच्या कलावंतांनी घेतली पंतप्रधानांची भेट, तिकिटावरील जीएसटी हटवल्याबद्दल मानले आभार
* मणिकर्णिका या चित्रपटातलं एक गाणं झालं रिलीज
* दिल्लीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शीला दीक्षित यांची नियुक्ती
* अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता २९ जानेवारीला घटनापिठासमोर
* घटनापीठातून न्या. लळीत बाहेर, नवीन घटनापीठ नेमणार
* मुंबईत फक्त महिलांसाठी १० तेजस्विनी शहर वाहतूक बसेस
* यवतमाळच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकू नये, आमचं आतिथ्य स्विकारा- स्वागताध्यक्ष मदन येरावार
* साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला सरकारच्या वतीने विनोद तावडे राहणार उपस्थित, समारोपाला येणार मुख्यमंत्री
* २१ दिवस मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ धाव पट्टीच्या डागडुजीसाठी राहणार रोज आठ तास बंद, २०० विमाने होणार रद्द
* नगर महापालिका निवडणूक: भाजपाचा प्रचार खर्च ५२ लाख, राष्ट्रवादीचा ०३ लाख, सेना, काँग्रेस, भाकप, सप, बसपा, आपचा हिशोब बाकी
* कोण पार्थ पवार?, अजित पवार यांचे पुत्र एवढीच त्यांची ओळख, कोणीही पवार विरोधात लढले तरी फरक पडणार नाही- श्रीरंग बारणे
* कोरेगाव भीमा प्रकरणी ९० दिवसांपेक्षा अधिक मुदत देण्याच्या राज्य सरकारच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून
* नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवले म्हणून युवकांना मारहाण, राज्यातील ही दंडेली संपवण्यासाठी भाजपला सत्तेतून घालवा- अशोक चव्हाण
* कॉंग्रेसच्या पूर्व विदर्भातील जनसंघर्ष यात्रेला रामटेकमधून सुरुवात
* 'मणिकर्णिका' चित्रपट 'ठाकरे' चित्रपटासाठी मागे घेण्यास नकार
* पिंपरी परिसरात दोन गटातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हवालदाराला मारहाण
* शिर्डी, नांदेड व कोल्हापूर विमानतळांवरून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा
* बासरीवादक पं. केशव गिंडे यांना पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान
* मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायच्या, दोन्ही काँग्रेसने कोणत्या मतदारसंघांत उमेदवारांची अदलाबदल करायची तिढा सुटला, ०३ जागांचा तिढा कायम
* रिटर्न न भरणाऱ्या व्यावसायिकांचे 'ई-वे बिल' रोखण्याचा तसेच ५० हजारापेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यासही घातली जाणार बंदी
* युथ फॉर इक्वॅलिटी स्वयंसेवी संस्थेची आरक्षणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर
* १९८४ शीख दंगल प्रकरणः सज्जन कुमार यांच्या याचिकेवर १४ जानेरीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'गीत रामायण'चे वाराणसीत आयोजन


Comments

Top