HOME   महत्वाच्या घडामोडी

जेटलींना कर्करोग, शहांना स्वाईन फ्लू, अण्णा उपोषणावर ठाम, आता ड्रोनने डिलीव्हरी, भुजबळांच्या सुरक्षेत कपात, डान्सबारचा आज फैसला.......१७ जानेवारी २०१९

जेटलींना कर्करोग, शहांना स्वाईन फ्लू, अण्णा उपोषणावर ठाम, आता ड्रोनने डिलीव्हरी, भुजबळांच्या सुरक्षेत कपात, डान्सबारचा आज फैसला.......१७ जानेवारी २०१९

* अरुण जेटली कर्करोगाने आजारी, न्यूयॉर्कला रवाना
* भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू, एम्समध्ये दाखल
* बेस्टचा संप मागे आता मनपाचे इतर कर्मचारी संपाच्या तयारीत
* बेस्ट संपातील कुठल्याही कर्मचार्‍यावर कारवाई होणार नाही
* संपामुळे बेस्ट फायद्यात रोज होणारा तीन कोटींचा तोटा नऊ दिवस झालाच नाही
* अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शिवस्मारकाचे काम थांबले- विनायक मेटे
* राज्याने दोन लाख ६१ हजार कोटी निधी खर्चलाच नाही
* नोटाबंदीनंतर आता नवीन नाणी, २० रुपयांचंही नाणे येणार
* काश्मीरमधील अतिरेकी या भूमीचे पुत्र, त्यांना वाचवा- महेबुबा मुफ्ती
* जितेंद्र आवाड आणि छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत कपात
* चंद्रावर पेरलेलं कापसाचं बियाणं उगवलं!
* पेट्रोलच्या दरात १४ तर डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ
* हेल्मेट हवं की नको? पुण्यात मतदान, हेल्मेट विरोधाला पसंती
* डान्सबार कायद्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* विमानतळांवर प्रवाशांना सामानाच्या स्कॅनिंगसाठी द्यावे लागणार पैसे
* कर्नाटक भाजपाचे सहा आमदार आज परतणार
* नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीची प्रक्रिया सुरु
* येरवडा येथे उभारण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे उद्घाटन आज करणार प्रकाश जावडेकर
* गिरीश महाजन यांची शिष्टाई अयशस्वी, पंतप्रधान कार्यालयाच्या आश्वासनानंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम
* लोकपाल नियुक्तीचे फक्त ०५ टक्के काम बाकी- पंतप्रधान कार्यालयाचे पत्र
* लोकपाल व लोकायुक्त यांच्या प्रत्यक्ष नियुक्तीशिवाय सरकारवर विश्वास ठेवणार नाही- अण्णा हजारे
* दुष्काळी परिस्थितीत राज्यात ०४ छावण्या तातडीने सुरू करा- अण्णा हजारे
* सत्तेसाठी आपण काय काय खोटे बोललात, याची आठवण मी करून देत राहीन- अण्णा हजारेंचे नरेंद्र मोदींना पत्र
* सत्तेवर येण्याआधी तुम्ही देशसेवक वाटत होता, देशाला योग्य नेता मिळाल्याची भावना होती मात्र सत्तेसाठी वारंवार सत्यापासून दूर गेला- अण्णा
* कायदेशीर प्रक्रिया करून आठवडाभरात शिवस्मारकाचे होणार काम सुरू- विनायक मेटे
* सूक्ष्म सिंचनाशिवाय कृषिक्षेत्राचा विकास अशक्य, राज्यातील सिंचनाचे बजेट वाढवा- नितीन गडकरी
* लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध- महादेव जानकर
* भाजप स्वतंत्र लढला तर लोकसभेच्या ०५ जागा 'रासप' साठी, युती झाल्यास ०२ जागा मागणार- महादेव जानकर
* राज्यात टीईटीची बोगस प्रमाणपत्र देऊन शाळेत नियुक्ती, प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे राज्य परीक्षा परिषदेचे आदेश
* छगन भुजबळ यांचे निकटवर्ती सदानंद लाड यांची मंदिरात आत्महत्या, १५ हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती
* परीक्षा शुल्क लाटणार्‍या कॉलेजांवर कारवाई करा- औरंगाबादेत विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर मोर्चा
* नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, औरंगाबादमध्ये नगरसेवक सय्यद मतिनवर गुन्हा दाखल
* पुण्यात 'ब्रेकअप' नंतर तरुणीवर रस्त्यात शस्त्राने वार, तरुणीचे बोट तुटले, उद्योजक प्रियकर गजाआड
* काँग्रेसने गांधीवाद केव्हाच सोडला ते अवसरवादी झाले आहेत, सत्तेसाठी भाजपसोबत केव्हाही जाऊ शकतात- प्रकाश आंबेडकर
* फेब्रुवारी महिन्यात नाट्य संमेलनाचे उदघाटन करणार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
* महाराष्ट्रात फिरण्यासाठी आलेल्या गुजरातमधील २२ पर्यटकांना मारहाण, ०३ जणांना अटक
* कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर
* चंद्रपूरमधील इरई धरण क्षेत्र व नागपूर जिल्ह्यातील खिंडसी तलाव क्षेत्रात होणार ०२ जल विमानतळ
* संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत
* सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय २४ जानेवारीला
* प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक 'ई-फायलिंग' प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीला मंजुरी
* मागील पाच वर्षांत देशात ४३४ वाघांचा मृत्यू
* अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्या लवकरच घरपोच सामान पोहोचविण्यासाठी करणार ड्रोनचा वापर


Comments

Top