HOME   महत्वाच्या घडामोडी

१५० फुटी तिरंगा आज फडकणार, भाऊ कदमला थिएटर मिळेना, डान्सबारला मान्यता सरकारचं सेटींग, प्रभू राम उत्तर भारतीय? स्वाईन फ्लू सक्रिय.......१८ जानेवारी २०१८

१५० फुटी तिरंगा आज फडकणार, भाऊ कदमला थिएटर मिळेना, डान्सबारला मान्यता सरकारचं सेटींग, प्रभू राम उत्तर भारतीय? स्वाईन फ्लू सक्रिय.......१८ जानेवारी २०१८

* १५० फुटी तिरंग्याचं आज पालकमंत्री अन शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते लातूरच्या क्रीडा संकुलात लोकार्पण
* भाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’ चित्रपटाला चित्रपटगृह मिळेना
* डान्सबार प्रकरणी सरकारने मुद्दाम बाजू नीट मांडली नाही- धनंजय मुंडे
* अकोल्यात नायलॉन मांज्यामुळं तरुणाचा गळा चिरला
* डान्सबारमध्ये जाताना ओळखपत्र दाखवणे आवश्यक करणार
* डान्सबारमधील सीसीटीव्हीला बंदी
* बेस्ट कर्मचार्‍यांना सात हजार नव्हे तर साडेतीन हजारांची वेतनवाढ
* शिवस्मारकाबाबत सरकार गंभीर नाही- उद्धव ठाकरे
* सीबीआयच्या चार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदला
* दाभोळकर प्रकरणी न्यायालयानं सीबीआयला फटकारलं
* प्रभू रामचंद्र उत्तर भारतीय होते- खा. पूनम महाजन
* पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक ०६ हजार ८५ कोटींचे
* सातारा पोलिसांच्या धाडीत सापडल्या ५५ बंदुका
* आयटी अभियंता मोहसीन खान प्रकरणी हिंदू सेनेच्या धनंजय देसाईला जामीन
* सोमवारी खग्रास चंद्रग्रहण, 'ब्लडमून, सुपरमून व वुल्फमूनचे होणार दर्शन
* एमपीएससीच्या प्राथमिक परिक्षेच्या जाहिरातीत दहा टक्के आरक्षणाचा समावेश
* राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून दोनदा धावणार
* वन डे: भारत-ऑस्ट्रेलियात आज तिसरा अंतिम सामना
* दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल न केल्याने हायकोर्ट नाराज, दुसऱ्या राज्यातील तपासावर अवलंबून राहणं लाजीरवाणं- हायकोर्ट
* राज्य सरकारची डान्स बारच्या सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरापर्यंतची वेळेची अट मान्य
* डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संमिश्र, सरकारच्या अनेक अटी झाल्या मान्य, याचा सविस्तर अभ्यास करून ठरणार पुढील दिशा
* शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थाळांपासून एक किलीमीटर दूरवर डान्सबार असावा- सुप्रीम कोर्ट
* डान्सबारमध्ये दारु वाटता येणार, सीसीटीव्हीची गरज नाही, पैसे उधळण्यास मनाई, तरुणींना देता येणार टीप
* डान्स बारच्या नावाखाली अनुचित प्रकार सुरू होणार नाहीत असाच सरकारचा प्रयत्न असेल- गृहराज्यमंत्री रणजीत पाटील
* डान्स बार मालक आणि मुख्यमंत्री यांच्यात शायना एनसी आणि आशिष शेलार यांनी मध्यस्थी, बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं डील- राष्ट्रवादी
* नगरच्या डॉन बॉस्को स्कुलची सहल बस आणि पिकअपचा अपघात, काही विद्यार्थी जखमी, अपघातात तिघे जागीच ठार, विद्यार्थी सुखरूप
* युतीसाठी भाजप अनुकूल आता निर्णय शिवसेनेने घ्यावा- सुधीर मुनगंटीवार
* लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाही, सेना-भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत - रावसाहेब दानवे
* मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ७० हजार चौरस फुटाचा मोकळा भूखंड धनदांडग्यांच्या घशात- धनंजय मुंडे
* राज्यात जानेवारीच्या वाढलेल्या थंडीमुळे 'स्वाइन फ्लू' सक्रिय
* जळगाव महापालिकेने बड्या थकबाकीदारांच्या नावांच्या याद्या लावल्या शहरातील चौकांमध्ये, माजी राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश
* बेस्ट संघर्षात शिवसेनेची महत्वाची भूमिका, सेनेला बदनाम करण्यासाठी संपाचे राजकारण करुन कामगारांना फसवले- आमदार अनिल परब
* राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे निधन
* इस्त्राइल आणि जपानने ज्या गतीने विकास केला तसा विकास आपल्या देशात दिसत नाही, देश पुढे जात आहे, मात्र गती थंड- सरसंघचालक
* पुण्यात धावणार मिथेनॉल-बायो डिझेलवरील १० बस- नितीन गडकरी
* सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थानांसह ०४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सेवाकाळ कमी करण्याचा निर्णय
* पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला जन्मठेप
* लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगारनिर्मिती महत्त्वाचा मुद्दा, कृषी क्षेत्रावरही भर, यासाठी रघुराम राजन यांचा सल्ला
* ७७ कोटी ३० लाख ईमेल आयडी आणि दोन कोटींहून अधिक पासवर्ड्सचा डेटाबेस लीक झाल्याचे उघडकीस
* लाचखोरी प्रकरणात सीबीआयने केली भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक एस. के. शर्मांसह ०६ जणांना अटक


Comments

Top