नांदेड: मोबाईलवर अश्लील चित्रपट दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसरीवर अत्याचाराचा प्रयत्न करणार्या मौलवीविरुध्द नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. फ़रार मौलवीचा तपास सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, येथील मदरसा इस्लामिया अरबिया नुरुलील बनात या मदरशातील मौलवी मौलाना साबेर फ़ारुकी याने दोन अल्पवयीन मुलींना मोबाईलवर अश्लील चित्रपट दाखवला. एकीवर अत्याचार केला, दुसरीवर तसा प्रयत्न केला. या मुली माजलगावच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या आई- वडिलांना सर्व सांगितले. आई- वडिलांनी मदरशात चौकशी केली. तक्रार केली तर मुलींना मारुन टाकेन अशी मौलवीने धमकी दिल्याचे तक्रारीत म्हणले आहे. मौलवीच्या धमकीनंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मौलवीवर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान मौलवी फ़रार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
Comments