HOME   महत्वाच्या घडामोडी

कामगारांची सुरक्षा व आरोग्य धोरण ठरवण्याची कामगार मंत्र्याची घोषणा

कामगारांची सुरक्षा व आरोग्य धोरण ठरवण्याची कामगार मंत्र्याची घोषणा

मुंबई: महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राज्य आहे तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुंतवणुकीचे एक प्रमुख कारण हे येथील कुशल कामगार हे देखील असून इज वाढणार्‍या उद्योग व्यवसायासोबत याचा कणा असणार्‍या कामगार या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच असंघटीत कामगार, इतर क्षेत्रातील कामगार व सर्व प्रकारच्या अस्थापानांसाठी पाळवयाच्या सुरक्षा व आरोग्य बाबतच्या कायदेशीर प्रावधानांचा अंतर्भाव करणार असल्याचे सुतोवाच कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी वाळूज येथील औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व परस्पर सहाय्यता गट (मार्ग) यांच्या संयुक्त विध्यामाने आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केले. कामगार मंत्र्यांनी कारखाने अधिनियम १९४८ च्या तरतुदींमध्ये सुधारणा करून कामगारांची सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी सध्या सुरक्षा अधिकार्‍यांच्या नेमणुकीसाठी आवश्यक १००० कामगारांच्या संख्येच्या अटीत बदल करून ती २५० कामगार अशी करण्याची तरतूद करण्यात येत आहे असे घोषित केले. तसेच सुरक्षा लेखा परीक्षक यांनी यापुढे सुरक्षा लेखा परीक्षण करताना काही निष्काळजीपणा केला असल्याचे आढळून आल्यास त्यांना ही जबाबदार धरण्यात येईल.
भारत हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सदस्य देश असल्याने देशाचे सुरक्षितता धोरण आहे. त्या धोरणास अनुसरून महाराष्ट्र राज्याचे सुरक्षा धोरण बनवण्याचे प्रस्तावित असून त्याबाबत सूचना मागून त्यास अंतिम रूप देण्यात येईल. महाराष्ट्र हे अशा प्रकारचे सुरक्षा धोरण बनविणारे देशातील पहिले राज्य आहे. ही बाब कामगार मंत्र्यांनी अधोरेखित केली. सदर प्रस्तावित धोरणाच्या मसुद्यातील ठळक बाबींचे अनावरण कामगार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कामगार सुरक्षित करण्यावर आपल्या भाषणात भर दिला तसेच प्रस्तावित मसुद्यावर सर्वांनी सूचना देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एस.पी. राठोड यांनी सुरक्षा धोरणाच्या मसुद्यानुसार प्रस्तावित कृती कार्यक्रमाबाबत सर्वांना अवगत केले व भविष्यात होऊ घातलेल्या कायद्यातील विविध सुधारण्याचे माहिती सर्व सुरक्षा अधिकार्‍यांना दिली. सुरक्षा अधिकारी हे या विभागाचे कारखान्यातील प्रतिनिधी असून त्यांनी कामगारांच्या सुरक्षे बाबत जबाबदार राहण्याचे आवाहन केले.


Comments

Top