HOME   महत्वाच्या घडामोडी

१७ राज्यात मुली कमी, मराठी शाळा बंद होऊ देणार नाही, नाना म्हणतात बिनधास्त बोला, साखरेचे दर पाडले, छिंदमला मारहाण, ठाकरे-फडणवीस गुप्त चर्चा......१८ फेब्रुवारी २०१८

१७ राज्यात मुली कमी, मराठी शाळा बंद होऊ देणार नाही, नाना म्हणतात बिनधास्त बोला, साखरेचे दर पाडले, छिंदमला मारहाण, ठाकरे-फडणवीस गुप्त चर्चा......१८ फेब्रुवारी २०१८

* पोलिस कोठडीत पडल्यानं डीएस कुलकर्णी जखमी, डोक्याला मार, ससूनमध्ये दाखल
* डीएसके आणि त्यांच्या पत्नींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
* मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूक परिषद, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे आज नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
* विमानतळाचे भूमिपूजन, मॅग्नेटिक महाराष्ट्रकड उद्घाटनाकडे शिवसेना फिरवणार पाठ
* पंजाब बॅंकेतील घोटाळा कॉंग्रेसच्या की भाजपच्या काळातला? नवा वाद सुरु
* शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या नगरच्या श्रीपाद छिंद या उप महापौराला कारागृहात मारहाण, नाशिकला हलवले
* कॉंग्रेस, राष्ट्रवादीला पुढची १५-२० वर्षे पकोडेच तळावे लागणार- मुख्यमंत्री
* मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यापासून जग मला दूर पळवते- अभिनेत्री रेखा
* उस्मानाबादेत चारा घोटाळा, चार्‍याच्या नावावर आले वाळलेले गवत
* देशातील १७ मोठ्या राज्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर घसरला
* मराठी शाळा बंद करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही- सुप्रिया सुळे
* देशातील सर्वात मोठी लूट करणार्‍या नीरव मोदीला पंतप्रधानांनी वाचवले- शरद पवार
* गप्प राहिल्याने सगळे आपल्या माथी येथे, बिनधास्तपणे बोला- नाना पाटेकर
* मदत घेऊन तुमच्या दारात येऊ का? मंत्री रावते रागावले वाशिमच्या शेतकर्‍यांवर
* मल्याळी अभिनेत्री प्रियाने गुगलवर सनी लिओनीलाही मागे टाकले
* साखर कारखानदार आणि व्यापार्‍यांनी मिळून साखरेचे दर पाडले- खा. राजू शेट्टी
* शिवाजीमहाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य: नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
* डीएसकेंना कर्ज देणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करणे आवश्यक- सरकार पक्षाचे कोर्टात मत
* तंत्रशिक्षणाचे कोर्स राबवणार्‍या शिक्षण संस्थेला आपले कॉलेज कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याविना बंद करता येणार नाही- उच्च न्यायालय
* शिवसेना-भाजप युतीचे भांडण फक्त सत्तेच्या वाटणीसाठी, शिवसेना ही भिवसेना झाली आहे- धनंजय मुंडे
* नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता, देशात नीट जगण्यात अडथळे येतात ते जीवनातून साहित्यात येतात- श्याम मनोहर सहित्य संमेलनात
* बडोद्यात मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप, धर्मा पाटील आत्महत्येप्रकरणी सरकारचा निषेध करणारा ठराव
* अलिबाग येथे बँक ऑफ इंडियाच्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी ०४ हजार परिक्षार्थी, पदवीधर, एम. एससी. कम्प्युटर पदवीधरांचा समावेश
* चौकशीसाठी बोलाविल्याचा राग येऊन राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी धमकावल्याचे पोलीस निरीक्षक यांची तक्रार
* पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मलिकांना बोलाविले दोंडाईचा पोलिस ठाण्यात
* राज्य सरकारने संयुक्त आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन केल्याने उच्च न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी
* मुंबई शहर व मुंबई उपनगरे या दोन जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे स्थापन करण्याचे होते आदेश
* सरकारची कृती न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी, कारवाई करण्याचा न्यायालयाचा इशारा
* बंद दरवाजाआड ठाकरे-फडणवीस चर्चा, युतीच्या संकेताने शिवसैनिक अस्वस्थ
* नीरव मोदीबाबत २०१६ मध्ये पंतप्रधान कार्यालयास पत्राने माहिती मिळाली होती, मात्र सरकार खबरदारी घेऊ शकले नाही- शरद पवार
* देशाची लूट झाली, घोटाळा संपूर्णपणे मोदी सरकारच्या काळातील- शरद पवार
* ठाण्यातील पंजाब नॅशनल बँकेसमोर राष्ट्रवादीने केली निदर्शने
* पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा, ०८ लाख ५८ हजार विद्यार्थी देणार ०६ हजार १७७ केंद्रांवर परीक्षा
* लेखा परीक्षकांनी नीरव मोदीच्या कंपन्यांच्या कमकुवत यंत्रणेबाबत दोन वर्षांपूर्वीच केली होती चिंता व्यक्त
* पीएनबी घोटाळा का आणि कसा झाला? याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा- राहुल गांधी
* पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करणाऱ्या गीतांजली ग्रुपचा मेहुल चोक्सीने नाशिकच्या फ्रेंचायजीला घातला ०७ कोटींचा गंडा
* गीतांजली जेम्सच्या विविध स्किममध्ये नाशिकचे ९०० हून अधिक ग्राहकांची फ़सवणूक
* पान परागचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव विक्रम कोठारी यांनी कानपूरमध्ये पाच बँकांना चुना लावल्याचे उघड
* आज दक्षिण अफ्रिकेसोबत भारताचा २०-२० सामना


Comments

Top