• 20 of March 2018, at 1.23 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

‘परी’ला पाकिस्तानबंदी, बारावीचे निकाल लांबणार, रजनीकांत-पाटेकर ‘काला’मध्ये, जुन्या नोटांचा निर्णय आरबीआयकडे, राम मंदीर: न्यायालय सांगेल तेच योग्य.......०३ मार्च २०१८

‘परी’ला पाकिस्तानबंदी, बारावीचे निकाल लांबणार, रजनीकांत-पाटेकर ‘काला’मध्ये, जुन्या नोटांचा निर्णय आरबीआयकडे, राम मंदीर: न्यायालय सांगेल तेच योग्य.......०३ मार्च २०१८

* शरद पवार आज लातुरात, दोन ठिकाणी कार्यक्रम, डॉ. गोपाळराव आणि अ‍ॅड गोमारे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन
* बारावीच्या ८० लाख उत्तरपत्रिका पडून, निकाल लांबण्याची शक्यता
* पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचे डोके, हात-पाय आणि धड वेगळे करुन हत्या केल्याचे उघड
* जिल्हा बॅंकेकडे पडून असलेल्या जुन्या नोटांचा निर्णय रिझर्व बॅंक करणार
* राज्यात बहुतांश भागांत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडय़ापासूनच काहिली सुरू, उष्मा मार्च महिन्यापासून आणखी वाढणार- हवामानशास्त्र विभाग
* राज्यसभेसाठी भाजपच्या प्रकाश जावडेकर, श्याम जाजू किंवा धर्मेद्र प्रधान, नारायण राणेंच्या नावाची चर्चा
* २०२२ सालापर्यंत सर्वांना घरे योजनेत ०९ लाख घरांची बांधणी अपेक्षित, ७६.५ दशलक्ष कामगारांची भासणार गरज- 'अॅनॉर्क' संस्थेचे निरीक्षण
* संभाजी भिडे गुरुजींचे नाव राज्य सरकारने २०१६ मध्ये पद्मश्रीसाठी सुचवले होते- माहितीच्या अधिकारात माहिती, ‘हिंदुस्थान टाइम्स’वृत्त
* राज्यात सरकारी रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची २० हजार पदे रिक्त
* राज्यात ५० हजार प्राथमिक केंद्रे, ०८ हजार उपकेंद्रे, २३ जिल्हा रुग्णालये, ३८७ उपजिल्हा रुग्णालये
* 'राणेंचे सुटत नसेल कोडं- तर कुठे अडलं घोडं', राणेंना भाजपने द्यावे केंद्रीय मंत्रिपद- रामदास आठवले
* कमला मील आग: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीला आवश्यक सेवासुविधा द्या- उच्च न्यायालय
* आयटीआय परीक्षेतील वजा गुणपद्धती होणार बंद, लाखो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
* स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बीडच्या प्रिती गोरख जाधवची पुण्यात परिक्षेच्या तणावातून आत्महत्या
* पत्नी सकाळी उशिरा उठते, रुचकर जेवण बनवत नाही, गृहकृत्यदक्ष नाही- पतीचा आरोप क्रूरपणात मोडत नसल्याने घटस्फोट नाही
* पत्नी गृहकृत्यदक्ष नसल्याने घटस्फ़ोटाची मागणी करणारा मुंबईतल्या पतीचा अर्ज फ़ेटाळला न्यायालयाने
* क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याची बतावणी करत मुंबईतील पायधुनीत ५० लाखांचे हिरे लंपास, चौघांना अटक, कामगारही गजाआड
* मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिकने परिचारिका, कर्मचारी, डॉक्टरांच्या उपस्थितीची नोंद न झाल्याने पगार रोखले
* निजामाच्या वंशजांची ३५० कोटींची जमीन विकत घेतल्याचे सांगत पाच कोटींची फसवणूक करणार्‍या पोलिसावर पनवेलमध्ये गुन्हा
* 'चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत बरोबर, डार्विनच्या सिद्धांतातील अनेक गोष्टी समजलेल्या नसल्यामुळे अपूर्ण- डॉ. जयंत नारळीकर
* साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड, भालचंद्र नेमाडे पराभूत
* पीएनबीचे माजी चीफ ऑडिटर बिष्णुब्राता मिश्रा यांना १४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी
* नीरव मोदीच्या मालकीच्या फायरस्टार डायमंड कंपनीकडून कर्ज वसुली करण्यास अमेरिकन न्यायालयाची स्थगिती
* 'राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणेच योग्य- मौलाना सलमान नदवी
* कर्नाटकात हिंदू युवा सेनेचा कार्यकर्ता नवीन कुमारला अटक, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप
* ‘गृहलक्ष्मी’ या मल्याळम मासिकावर स्तनपानाचा फोटो छापल्याबद्दल वकिलाने केला गुन्हा दाखल
* सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काला' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
* नवी दिल्लीत पाण्याने भरलेला फुगा अंगावर फेकणार्‍या तरुणाला मारहाण, चाकूचे ५० वार
* टॉपिक'ची नीट माहिती नसणारे लोक पीएचडी करतात, महाराष्ट्रातील एका मंत्र्याची अशाच प्रकारची पीएचडी - केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंग
* छत्तीसगडमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
* काळी जादू आणि मुस्लीमविरोधी भावना व्यक्त झाल्याने अनुष्का शर्माच्या 'परी' या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी- एक्स्प्रेस ट्रिब्युन
* भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौर हिने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
* चीनमधून येणाऱ्या स्टीलवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियमवर १० टक्के जादा आयातशुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय


Comments

Top