logo
news image पाच राज्यात कॉंग्रेस आघाडीवर news image मोदी सरकारच्या विरोधात एकवटले २१ विरोधी पक्ष news image विजय माल्ल्याला पाठवा परत भारतात, लंडन कोर्टाचा आदेश news image लातुरच्या न्यायालयाच्या परिसरात थुंकणार्‍यावर लगेच खटले, ८० सीसीटीव्ही कॅमेरे news image कर्नाटकात लिंगायतांना अल्पसंख्याचा दर्जा देण्यास न्यायालयाचा नकार news image आरक्षणासाठी लातूरचा लिंगायत समाज पुन्हा भेटणार मुख्यमंत्र्यांना news image लोदगा येथे होणार हवामान बदलांचा अभ्यास news image भाजपाच्या जाहीरनाम्याचे धनगर कर्यकर्त्यांनी केले उदगीरमध्ये दहन news image दुकानफोडी प्रकरणी लातुरात दोघांना अटक, दोन दुचाकी जप्त news image मुंबई-बीदर धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म, लातुरच्या अधिसेविकेने केली मदत news image लातूर परिसरातील ६० खडी केंद्रांची करणार ड्रोनद्वारे मोजणी news image लातूर शहरातील तीन आधार केंद्रे सुरु, बाकी बंद news image पंचायत समिती, तहसील, मनपा, बॅंका आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार बाकी केंद्रं news image मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम, तेलंगणा, राजस्थानात आस्तित्व टिकवण्याचे कॉंग्रेसला आव्हान news image संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात news image यमुनेत नाव बुडाल्याने मराठवाड्यातील तिघांचा मृत्यू

HOME   काल, आज आणि उद्या

हरंगुळची बोगी, लाखाची बॅग, अशोकराव दिवसभर लातुरात, मुलींचा अन्नत्याग, राणेंची गरज राज्याला, पतंगराव लिलावतीत......०४ मार्च २०१८

हरंगुळची बोगी, लाखाची बॅग, अशोकराव दिवसभर लातुरात, मुलींचा अन्नत्याग, राणेंची गरज राज्याला, पतंगराव लिलावतीत......०४ मार्च २०१८

* उत्तर महाराष्ट्र आणि विदरभात येत्या बुधवारी गारपिटीची शक्यता, सतर्क राहण्याचा इशारा
* औरंगाबादचा कचरा प्रश्न १७ व्या दिवशीही तसाच
* सरकारची कुवत नसेल तर मुंबईतल्या शिवपुतळ्यावरचं छत्र आम्ही उभारतो- उद्धव ठाकरे
* मिलींद एकबोटे आणि भिडे गुरुजींना अटक करा, भारीप बह्जन महासंघाची मागणी
* हरंगुळ येथेच बोगी कारखाना, ३१ मार्चला भूमिपूजन- पालकमंत्री
* लातुरात पानगावच्या सतीश कोनाळेंची सव्वा लाख असलेली बॅग पळविली
* औसा मार्गावर करजगाव पाटीजवळ बस आणि टेम्पोच्या धडकेत २५ जण जखमी
* चाकूर तालुका कॉग्रेस अध्यक्ष विलासराव पाटलांना सरचिटणीसपद दिल्याने कार्यकर्ते नाराज
* पोलिसांनी मारहाण केल्याची उदगीरचे वकील अजिंक्य रेड्डी यांची तक्रार
* लातूर जिल्हा परिषद प्रथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ मार्चपर्यंत करण्याचे निर्देश
* कृषी विभागाचे योजना देण्याचे आश्वासन, चाकूर तालुक्यात ४५ शेतकर्‍यांची फ़सवणूक, तिघांचा आत्मदहनाचा इशारा
* को एज्युकेशनच्या विरोधात लातुरात तंत्रनिकेतनच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन
* स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत लातुरात सोमवारी पदाधिकार्‍यांची बैठक
* संभाजीराव पाटील यांनी हासोरीत केले सौर उर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन
* कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज लातुरात, कार्यकर्ता मेळावा, पत्रकार परिषद, जाहीर सभा
* केज येथे आगीत बारावीच्या गणिताच्या आणि दहावीच्या मराठीच्या १११९ उत्तरपत्रिका जळून खाक
* नारायण राणे राज्यसभा नव्हे तर विधानसभेतच हवेत, ‘राणे यांची महाराष्ट्राला अधिक गरज - नितेश राणे, राणे दिल्लीत जाण्यास नाखूश
* अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीतून शोधून काढण्यासाठी नौदलाला पाचारण
* बेस्टच्या खाजगीकरणाविरोधात सोमवारी कामगार संघटनांचा मुंबईत निषेध मोर्चा
* काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम लीलावती रुग्णालयात दाखल
* एमपीएससी परीक्षा लेखनिक: एकदा काम केल्यास दुसऱ्यांदा लेखनिक म्हणून काम करण्यास मज्जाव
* उमेदवार, स्पर्धापरीक्षेतून निवडलेल्या अधिकार्‍यांना करता येणार नाही काम
* ‘व्यावसायिक लेखनिक’ नसल्याचे हमीपत्रही लागणार द्यावे
* नागपूर येथे मोबाईल घेऊन न दिल्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
* औरंगाबाद येथे कचरा नेणाऱ्या गाड्या अडवण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन
* पुणे येथे व्याजाचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाचे अपहरण करणार्‍या पाच जणांपैकी दोघांना अटक
* ठाणे येथे इराणी गँगला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांचा हल्ला
* मुंबईतील सानपाडा येथे आईवडील रागावल्याने १४ वर्षाच्या मुलीने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
* ओएलएक्सवरुन कार घेणार्‍या पुण्याच्या व्यापाऱ्याची ०२ लाख १८ हजाराला फसवणूक, गुन्हा दाखल
* यवतमाळ जिल्ह्यात गर्भवतीचा खून करून चेहरा व हात जाळला
* सैन्यदलात नोकरी लावून देण्याचे आमिष, साडे एकोणतीस लाखांची फसवणूक, विशाखापट्टणमच्या ०८ युवकांची जळगाव पोलिसांकडे तक्रार
* बिबट्यांची संख्या वाढत गेल्यास त्यांच्या नसबंदीचा विचार करावा लागेल- पुण्याचे वनसंरक्षक विवेक खांडेकर
* कनिष्ठ प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे बारावीच्या ८० लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून, मागण्या मान्य झाल्याशिवाय बहिष्कार मागे नाही
* लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर कॉपीच्या संशयावरून विद्यार्थिनींचे कपडे उतरविले, प्राचार्य आणि कर्मचार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल
* मेघालयमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेचा दावा करणार : कमलनाथ
* छत्तीसगडमध्ये नवोदय विद्यालयातील १७५ विद्यार्थ्यांना विषबाधा
* कर्नाटक विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीत पूर्वोत्तर राज्यांतील यशाचे प्रतिबिंब उमटेल- भाजपचे अमित शहा
* राजस्थानात भरतपूर आणि अलवर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दलित तरुणांची हत्या
* ओदिशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत पक्षाचा सुवर्णकाळ सुरू होणार नाही - अमित शहा
* पीएनबी घोटाळा: नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
* देशाचा ईशान्य भाग विकासाच्या यात्रेचं नेतृत्व करण्यासाठी आलाय याचा आनंद, काँग्रेसची उंची इतकी खुजी कधीही झाली नव्हती- नरेंद्र मोदी
* म्हैसूरमधील नागरहोल व्याघ्र प्रकल्प संचालक मणिकांतन यांचा हत्तीने चिरडल्याने मृत्यू
* राफेलची तुलना बोफोर्सशी करू नका, यात कोणताही घोटाळा नाही - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन
* सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून पटकावले विजेतेपद


Comments

Top